विठाबाई नारायणगावकर पुरस्कार समितीची पुनर्रचना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

मुंबई - तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार समितीची पुनर्रचना न झाल्याने या वर्षी पुरस्कार देण्यास उशीर झाला. या पार्श्‍वभूमीवर पुरस्कार समितीची पुनर्रचना राज्याच्या सांस्कृतिक विभागाने केली आहे. 2015 मध्ये स्थापन केलेल्या या समितीचा कार्यकाळ संपल्याने 29 नोव्हेंबर 2018 रोजी पुरस्कार समिती नव्याने स्थापन करण्यात आली.

या समितीमध्ये दत्तोबा फुलसुंदर, लता पुणेकर, जयमाला इनामदार, प्रकाश खांडगे, भीमराव गोपाळ, विद्याधर जिंतीकर, श्‍यामल गरुड आदी सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत एवढ्या कालावधीसाठी राहील.

Web Title: tamasha Vithabai Narayangaonkar award committee Reconstruction