रिक्षाचालकांविरोधात तनिष्का महिला गटाचे परिवहन अधिकाऱ्यांना साकडे 

मुरलीधर दळवी 
सोमवार, 16 एप्रिल 2018

मुरबाड (ठाणे) : मुरबाड शहरात  दिड पट भाडे आकारून रिक्षा चालक ग्राहकांची लूटमार करीत आहेत रिक्षा चालकांच्या मनमानी विरोधात स्त्री शक्ती महिला समाज संघटना व तनिष्का महिला गटाने परिवहन अधिकाऱ्यांना साकडे घातले आहे.

मुरबाड शहरामध्ये परिवहन अधिकाऱ्यांनी रिक्षाचे किमान भाडे 20 रुपये निश्चित केले आहे परंतु हा नियम पायदळी तुडवून रिक्षाचालक कमीतकमी 30 रुपये भाडे वसूल करत आहेत तर तोंडलीकर नगर सारख्या वसाहती मध्ये जाण्या साठी 50 रुपये सक्तीने वसूल केले जातात शहरात एकही रिक्षा चालक मीटर प्रमाणे भाडे आकारत नाही तरी सुद्धा कल्याण चे परिवहन अधिकारी मुरबाड कडे ढुंकूनही पाहत नाही.

गरोदर व लेकुरवाळ्या महिला वृद्ध अपंगांना प्रवासा साठी रिक्षा शिवाय पर्याय नसल्याने नाईलाजाने त्यांना ही सक्तीची खंडणी द्यावी लागते या विरोधात स्त्री शक्ती सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा व तनिष्का गट समनवयक नंदा गोडाबे यांनी परिवहन अधिकाऱ्याना रिक्षा चालकांवर कारवाइई करून प्रवाशांची लूटमार थांबवावी असे निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे मुरबाड तनिष्का महिला गट प्रमुख सुश्मिता तेलवणे, शिल्पा देहेरकर , कामिनी गायकवाड यावेळी उपस्थित होत्या.

मुरबाड बस स्थानक ते राम मंदिर उगळे आळी संभाजी नगर तोंडलीकर नगर गणेश नगर अशा प्रवाशी संख्या जास्त असणाऱ्या भागात शेअर रिक्षा सुरू कराव्यात मीटर प्रमाणे रिक्षा भाडे आकारावे रिक्षा चालकांच्या विरोधात तक्रार करण्या साठी मुरबाड शहरात सोय करावी अशा त्यांच्या मागण्या आहेत.

Web Title: tanishka group complaint against auto drivers