तानसा धरण वीजनिर्मितीत स्वयंपूर्ण

नरेश जाधव
गुरुवार, 18 मे 2017

खर्डी - मुंबई महापालिकेने शहापूर तालुक्‍यातील तानसा धरणावर ४० किलो वॉट वीजनिर्मिती प्रकल्पाची निर्मिती केली आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे पाणी वाया जाऊ न देता मध्य वैतरणा, मोडकसागर जलाशायाचे पाणीही वापरण्यात येणार आहे. याद्वारे महापालिकेचे जवळपास १८ लाखांचे वीज बिल वाचणार आहे. तसेच या प्रकल्पावर देखरेखीसाठी स्वतंत्र कर्मचारी ठेवण्याची आवश्‍यकता नसल्याचे तानसा येथील सहायक अभियंता पी. बी. चित्रवंशी यांनी सांगितले.

तानसा धरणाच्या बांधाखालीच हा वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यासाठी ५० लाखांहून अधिक रकमेच्या खर्चाची तरतूद २०१५-१६ या अर्थसंकल्पीय वर्षात करण्यात आली होती. सध्या तानसा धरणाच्या दैनंदिन वापरासाठी महाराष्ट्र राज्य महापारेषण कंपनीकडून वीजपुरवठा होत आहे. या वीज देयकापोटी दरमहा दीड लाख रुपये महापालिका अदा करीत आहे. ही वार्षिक रक्कम अंदाजे १८ लाख रुपयांच्या घरात जात असल्याने महानगरपालिकेच्या स्वतंत्र वीजनिर्मितीच्या निर्णयामुळे ही रक्कम वाचणार आहे. सध्या तानसा येथे ३० किलो वॉट विजेची गरज असून उर्वरित १० किलो वॉट वीज भविष्यात उपयोगी पडणार आहे. उर्वरित पाइप फिटिंगचे काम येथील स्थानिक कर्मचाऱ्यांनी मुंबईला होणारा पाणीपुरवठा बंद न करता केले आहे.

तानसा धरण बांधावरील वीज दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे व पाणी पातळीवर आधारीत दरवाजे यांच्या वीज वापरासोबतच येथील महापालिकेचे कार्यालय, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने व पथदिवे तसेच भविष्यात धरणाखाली वसलेल्या परंपरागत गावांसही नव्याने स्थापित होत असलेल्या वीजनिर्मिती केंद्राद्वारे वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे तानसा धरणमाथ्यावरील मुंबई महापालिकेच्या मोडकसागर (वैतरणा) या दुसऱ्या धरणासही तानसा धरणनिर्मित वीजपुरवठ्याच्या टप्प्यात आणले आहे. धरणातून वीजनिर्मिती केंद्रात सोडण्यात येणारे पाणी पुनश्‍च धरणात वळविण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांची कल्पना प्रत्यक्षात
तानसा धरणाखाली मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेवर वीज प्रकल्प उभारणीची संकल्पना मुंबई मनपाचे कार्यकारी अभियंता रमेश मालविया व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्यासमोर मांडली व या प्रकल्पाच्या ब्लू प्रिंटची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहणी करून तत्काळ मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला.

या तानसा वीज प्रकल्पामुळे मुंबई मनपाच्या लाखो रुपयांची बचत होणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास अन्य ठिकाणी वीज प्रकल्प उभारणीचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यात धरणालगत असलेल्या पाड्यावर वीज देण्याचा प्रयत्न असेल.
- रमेश मालविया,  कार्यकारी अभियंता.

Web Title: Tansa Dam Project is self-contained in the production