esakal | विरार : तानसा नदीत बुडालेल्या दोन तृतीयपंथींचे मृतदेह सापडले | Tansa River
sakal

बोलून बातमी शोधा

Drowning

विरार : तानसा नदीत बुडालेल्या दोन तृतीयपंथींचे मृतदेह सापडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा : विरार पूर्व खानिवडेजवळील तानसा नदीत (Tansa river) बुडालेल्या तीन तृतीयपंथींपैकी दोघांचे मृतदेह (Transgender dead body) आज सापडले असून, एका तृतीयपंथीचा मृतदेह अद्यापही बेपत्ता आहे. एक २४ तासांनंतर सकाळी साडेदहा वाजता, तर एक सायंकाळी ६ वाजता ३२ तासांनंतर मिळाला.

हेही वाचा: किरकोळ कारणावरुन पनवेलमध्ये तरुणाची हत्या; आरोपी अटकेत

हारिका अंदुकोरी (वय ३९), सुनीता गोणामुडी ऊर्फ पुरी (२७) असे मृतदेह सापडलेल्या तृतीयपंथींचे नाव असून, प्राची आकुला (२३) याचा मृतदेह अद्यापही बेपत्ता आहे. हारिकाचा मृतदेह आज सकाळी साडेदहा वाजता खानिवडे महालक्ष्मी मंदिराजवळ खाडीत, तर सुनीताचा मांडवी हद्दीत घटनास्थळापासून ५०० मीटर अंतरावर मिळाला. दोन दिवसांपासून मांडवी परिक्षेत्राचे प्रभारी दिलीप राखे, वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, मुंबईतील जलतरणपटू सुरेश शिंदे यांच्याकडून मृतदेह शोधण्यासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत. आज दोन मृतदेह शोधण्यात यश आले; पण आणखी एक मृतदेह बेपत्ताच आहे.

loading image
go to top