मीरा भाईंदर पालिकेचे आर्थिक गणित कोलमडणार? २७१ कोटींच्या महसूलीचे उद्दीष्ठ; जमा मात्र 'एवढेच'!

मीरा भाईंदर पालिकेचे आर्थिक गणित कोलमडणार? २७१ कोटींच्या महसूलीचे उद्दीष्ठ; जमा मात्र 'एवढेच'!


भाईंदर  -  मीरा  भाईंदर पालिकेने  चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी २७१ कोटी रुपयांच्या  उत्पन्न उद्दिष्ट ठेवले होते. परंतु आतापर्यंत  मालमत्ता कराची देयके वितरणा अभावी चक्क धूळखात पडली आहेत. या करापोटी आत्तापर्यंत ऑनलाईन पद्धतीमुळे अवघा १.५ कोटींचा महसूल गोळा झाला आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या संकटात सापडलेल्या या महानगरपालिकेमध्ये नागरी विकास कामांचा पुरता बोजवारा उडणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कर विभागातील कर्मचाऱ्यांना लवकर आरोग्य सेवेतून मुक्त न केल्यास त्याचा मोठा फटका पालिकेच्या विकास कामांना  आणि कर्मचाऱ्याच्या वेतनाला  बसणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

मीरा-भाईंदर शहरात साधरणत: ३.५ लाख मालमत्ता कर धारक आहेत या पैकी अडीच लाखाडून अधिक निवासी कर धारक आहेत. गतवर्षी मालमत्ता करापोटी २१६ कोटी रुपयांचे उत्पत्त प्रशासनाने अपेक्षिले होते. यापैकी १३५ कोटी रुपये या करापोटी महापालिकेला मिळाले होते. चालु आर्थिक वर्षात महापालिकेने २७१ कोटी रुपयांचे उत्पन्न या मालमत्ता करापोटी मिळणार असल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात कोरोनाच्या महामारीवर नियंत्रण ठेवण्याच्या नावाखाली महापालिकेने मालमत्ता कर विभागातील कर्मचारी वर्गाला देखील रस्त्यावर उतरविले आहे. त्यामुळे मालमत्ता कराची देयची कर दात्यांना वितरीत होऊ शकली नाही. या विभागाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाल्याने मालमत्ता कराची देयके अक्षरश: धुळ खात पडून आहेत.

      मागील पाच महिन्यांपासून हा विभाग बंद असून आत्तापर्यंत ऑनलाईन पद्धतीने केवळ दीड कोटीचाच महसूल गोळा झाला आहे. मालमत्ता कराची वसूली झाली नसल्याने त्याचा विपरित परीणाम नागरी विकास कामांवर होणार आहे इतकेच नव्हे तर कर्मचार्‍यांच्या वेतनावर देखील आर्थिक संकटाचे सावट पडले आहे. 
कोरोना मुळे हजोरो व्यवसाय बंद पडले आहेत. खाजगी कंपन्यांनी तर नोकर कपातीचा सपाटा सुरु केला आहे. त्यामुळे मालमत्ता करात सूट द्यावी अथवा मालमत्ता कर रद्द करावा अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. मात्र लोकांच्या भावना लक्षात घेता मालमत्ता करात सुट देण्याचा प्रस्ताव भाजपाकडून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडला जाण्याची दाट शक्यता असल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले.

कोरोनामुळे सर्व कर्मचारी आरोग्य सुविधेसाठी झटत आहेत. त्याचा परिणाम मालमत्ता कराच्या वसुलीवर झाला आहे मालमत्ता कराच्या कर्मचाऱ्यांना जर यातून मुक्त केल्यास वसुली होऊ शकेल . पुढील काही काळात आमचा भर हा जास्तीत जास्त कर वसुलीवर असणार आहे. 
 संजय दोंदे ,
कर निर्धारक व  संकलक मीरा भाईंदर महानगर पालिका

-------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com