कोविड लस वितरणासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स

कोविड लस वितरणासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स

मुंबई: कोविड लस प्रभावीपणे निर्माण करून तिचे वितरण करणे ती देण्याबाबतचा प्राधान्यक्रम निश्चित करणे आणि त्या लसीची किंमत आणि प्रमाण ठरविण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

या टास्क फोर्समध्ये वित्त, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, आरोग्य सेवा आयुक्त, वैद्यकीय शिक्षण संचालक, डॉ. शशांक जोशी त्याचप्रमाणे जे.जे. आणि केईएम रुग्णालयाच्या प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध विभागांचे प्रमुख सदस्य असतील.

या टास्क फोर्सने लस साठवण आणि वितरण व्यवस्थेसाठी शीत साखळी ठरविणे आणि लसीकरणाच्या शेवटच्या टप्प्यांपर्यंत आवश्यक बाबी तसेच किंमत ठरविणे अपेक्षित आहे.

कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात आलेली असल्याचं सांगत लसीकरणासाठी जिल्हा आणि ब्लॉकस्तरावर टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारांना दिलेत. यावेळी संसर्ग वेगानं वाढत असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मोदींनी सविस्तर चर्चा केली. या बैठकीत महाराष्ट्रात कोरोना लसीकरण कसे करावे आणि लस वितरणासंदर्भात टास्क फोर्सची स्थापना आधीच करण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितलं. लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी राज्य सरकारची सातत्याने चर्चा सुरु असल्याचंही त्यांनी नमूद केले आहे.

Task Force chaired by Chief Secretary Covid Vaccine Distribution

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com