कुपोषण निर्मूलनासाठी टास्क फोर्स - पंकजा मुंडे

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

मुंबई - राज्यातील विविध भागांमध्ये कुपोषणांची असलेली गंभीर समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत दिली. अतुल भातखळकर यांच्यासह अनेक आमदारांनी विधानसभेत ही लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर उत्तर देताना मुंडे म्हणाल्या, की कुपोषण निर्मूलन करण्यासाठी आदिवासी, महिला व बालविकास व आरोग्य विभागांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. यासाठी महिनाभरातच टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी कुपोषणामुळे सुमारे 18 हजार बालकांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2016 या कालावधीत 8 हजार बालके दगावली आहेत.

मुंबई - राज्यातील विविध भागांमध्ये कुपोषणांची असलेली गंभीर समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत दिली. अतुल भातखळकर यांच्यासह अनेक आमदारांनी विधानसभेत ही लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर उत्तर देताना मुंडे म्हणाल्या, की कुपोषण निर्मूलन करण्यासाठी आदिवासी, महिला व बालविकास व आरोग्य विभागांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. यासाठी महिनाभरातच टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी कुपोषणामुळे सुमारे 18 हजार बालकांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2016 या कालावधीत 8 हजार बालके दगावली आहेत. राज्यपालांनी बैठक बोलावून चिंता व्यक्‍त केली होती.

Web Title: Task Force to eradicate malnutrition