टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च नमुन्यांचा नव्याने अभ्यास करणार

भाग्यश्री भुवड | Sunday, 4 October 2020

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि पालिका मिळून गोळा केलेल्या नमुन्यांचा अभ्यास करण्याच्या प्रयत्नात आहे. या दोन सिरो सर्व्हेसाठी जमा झालेल्या नमुन्यांचा पुन्हा एकदा अभ्यास करुन नव्या एका अँटीबॉडीचा शोध लावला जाणार आहे.

मुंबई: मुंबईतील करण्यात आलेल्या दोन सिरो सर्व्हेमध्ये कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी  तयार होणाऱ्या एक प्रकारच्या अँटीबॉडी अभ्यास केला. मात्र, आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि पालिका मिळून गोळा केलेल्या नमुन्यांचा अभ्यास करण्याच्या प्रयत्नात आहे. या दोन सिरो सर्व्हेसाठी जमा झालेल्या नमुन्यांचा पुन्हा एकदा अभ्यास करुन नव्या एका अँटीबॉडीचा शोध लावला जाणार आहे.

सार्स कोविड 2 व्हायरसचा संसर्ग पसरल्यानंतर वेगवेगळ्या अँटीबॉडीजवर संशोधन केले गेले. ज्याचा उपयोग हा कोविडवरील येणाऱ्या लसीसाठी होणार आहे. पहिल्या दोन सर्व्हेमध्ये पालिका आणि TIFRच्या टीमने न्यूक्लिओकॅपसिड अँटीबॉडीचा अभ्यास केला  गेला होता. मात्र, आता आरबीडी या दीर्घकाळ टिकणाऱ्या अँटीबॉडीचा अभ्यास केला जाणार आहे.

चिंचपोकळीच्या कस्तुरबा रुग्णालयातील मॉलिक्यूलर डायग्नोस्टिक प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. जयंती शास्त्री यांनी सांगितले की, दोन्ही सेरो सर्वेक्षणातील अभ्यास कोविड 19 विरोधात तयार झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी एकत्रित केले जाईल. अँटीबॉडीज या वेगवेगळ्या स्थितीत आणि वेगवेगळ्या टप्प्यावर विकसित होतात आणि मरतात. आम्ही मुंबईत केलेल्या सेरो सर्वेक्षणात न्यूक्लियोकॅप्सीड अँटीबॉडी आधी विकसित होताना पाहिले आहे. या अँटीबॉडीचे 70 दिवसांचे अर्धे आयुष्य असते. त्यानंतर ती क्षय व्हायला सुरुवात करते, असे ही डॉ. शास्त्री यांनी सांगितले आहे.

अधिक वाचाः  केईएममध्ये BCG चाचणीला वेग, कोविड 19 साठी ठरणार उपयुक्त

टी.आय.एफ. आरमधील इतर मुख्य संशोधक डॉ. उल्लास कोल्थूर म्हणाले की, आरबीडी अँटीबॉडी शोधण्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या सिरो सर्वेक्षणातील काही नमुने वापरले जातील. आरबीडी म्हणजे रिसेप्टर-बाइंडिंग डोमेन अँटीबॉडी.

अधिक वाचाः  त्यानंतरच मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय घेऊ: पियुष गोयल

 जुलै आणि ऑगस्टमध्ये एम-पश्चिम (चेंबूर), एफ-उत्तर (सायन आणि वडाळा) आणि आर-उत्तर (दहिसर) येथे त्यांनी दोन सेरो सर्वेक्षण केले. पहिल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की 57% झोपडपट्ट्यांमधील आणि 16 टक्के झोपडपट्टी परिसर नसलेल्यांमध्ये न्यूक्लियोकॅप्सीड अँटीबॉडी  कोविड 19 च्या विरोधात तयार झाली होती. दुसऱ्या सिरो सर्व्हेत 45 टक्के झोपडपट्ट्यांमध्ये आणि 18 टक्के बिगर झोपडपट्टी परिसरात ही न्यूक्लियोकॅप्सीड अँटीबॉडी कोविड 19 च्या विरोधात तयार झाली.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, दुसऱ्या सर्वेक्षणात संसर्ग दरात घट होण्यासोबतच लोकांमध्ये अँटीबॉडीजच्या पातळीत घट नोंदवली गेली. मे-जून दरम्यान झोपडपट्ट्यांमध्ये संसर्गात जास्त प्रमाणात वाढ दिसून आली. त्यानंतर, कोविड -19 चा प्रादुर्भाव ऑगस्टमध्ये कमी झालेला आढळला जेव्हा दुसऱ्या सर्वेक्षणासाठी नमुने घेण्यात आले. त्यानंतर, अँटीबॉडीचेही प्रमाण कमी झाले कारण, संसर्गाचे प्रमाण  कमी झाले होते.

-----------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Tata Institute of Fundamental Research will study the samples