टाटाचे अध्यक्षपद न सोडण्याचा मिस्त्रींचा मानस

पीटीआय
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

मुंबई - टाटा समूहाच्या संचालक मंडळाने टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पदच्युत केले असले तरी या पदाचा राजीनामा देण्याचा सायरस मिस्त्री यांचा विचार नसल्याचे समजते. टाटा स्टील, टीसीएस आणि टाटा मोटर्ससह टाटा समूहातील कंपन्यांचे अध्यक्ष म्हणूनच काम करण्याचा त्यांचा मानस असल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी (ता. 4) टाटा समूहातील इंडियन हॉटेल्स लिमिटेडच्या तिमाही निकालाबाबत होणाऱ्या बैठकीसही ते अध्यक्ष म्हणूनच उपस्थित राहणार आहेत.

टाटा समूहातील टाटा स्टील, टीसीएस, टाटा मोटर्स, इंडियन हॉटेल्स, टाटा पॉवर, टाटा ग्लोबल बेव्हरेजेस, टाटा केमिकल्स, टाटा इंडस्ट्रीज आणि टाटा टेलिसर्व्हिस या नऊ कंपन्यांचे मिस्त्री अध्यक्ष आहेत. 24 ऑक्‍टोबरला हकालपट्टी झाल्यानंतर ते अध्यक्षपदावरून पायउतार होतील, अशी टाटा समूहाला अपेक्षा होती. आठ दिवस उलटले तरी मिस्त्री यांनी पद सोडलेले नाही. दुसऱ्या तिमाही निकालाबाबत इंडियन हॉटेल्सच्या संचालकांची शुक्रवारी बैठक होणार आहे. पुढील आठवड्यात 10 नोव्हेंबरला टाटा केमिकल्सच्या बैठकीतही ते अध्यक्षस्थानी असतील. कायद्यानुसार असलेली कर्तव्य ते बजावत राहतील, असे मिस्त्रींच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले. सध्या रतन टाटा हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. नव्या अध्यक्षाची चार महिन्यांत निवड करणे बंधनकारक आहे.

Web Title: Tata presidency not to leave cyrus mistry