training
training

टाटा ट्रस्ट डॉक्टरांना देणार ट्रेनिंग ;कोविड रुग्णांवरील उपचाराचे देणार प्रशिक्षण 

मुंबई : कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे वैद्यकीय व्यवसाईकांनीही पुढे येऊन मदत करावी यासाठी टाटा ट्रस्ट आणि टाटा ग्रुपने वैद्यकीय क्षेत्रांत काम करणाऱ्यांसाठी सीएमसी वेल्लोर व सीआयएचएस हैद्राबाद या संस्थांसोबत एकत्रितपणे मोफत प्रशिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे.

कोरोना रुग्णांवरील उपचार आणि त्यांच्या देखभालीची अधिक जास्त कौशल्ये आत्मसात करता यावीत यासाठी आरोग्य क्षेत्रातील काम करणाऱ्यांना साहाय्य करण्यासाठी टाटा ट्रस्ट्सचा हा उपक्रम चालवला जाणार आहे.

रतन टाटा यांनी नमूद केले होते की, आजवरच्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक कोविड विरोधातील लढाईसाठी आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी तात्काळ आपत्कालीन साधने तैनात करणे गरजेचे आहे. त्यानुसार हे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये 22 तासांचे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅम्स हे निवडक रुग्णालयांनी निश्चित केलेल्या विशिष्ट कर्मचाऱ्यांसाठी असून ते मोफत दिले जात आहेत. 

गंभीर स्थितीतील रुग्णांवरील उपचारांच्या व्यवस्थापनातील विशेषज्ञ असलेल्या आयसीयू फिजिशियन्स आणि इंटेन्सिव्हिस्टसना कोविड रुग्णांवरील उपचारांसाठी मोठ्या संख्येने डॉक्टर्स, नर्सेस आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची मदत भासणार आहे.  ही गरज पूर्ण करण्यासाठी नॉन-आयसीयू कर्मचाऱ्यांना गंभीर स्थितीतील रुग्णांवरील उपचार आणि त्यांच्या देखभालीची मूलभूत तत्त्वे व प्रक्रिया यांची माहिती करवून देणे हा या प्रशिक्षण कार्यक्रमांचा उद्देश आहे.

कसे असेल प्रशिक्षण:

या प्रशिक्षणामध्ये आयसीयूमध्ये दिले जाणारे उपचार आणि प्रक्रियांमधील अत्यावश्यक बाबी, एअरवे मॅनेजमेंट, व्हेंटिलेशन मॅनेजमेंट यासारख्या क्रिटिकल केयर कौशल्यांची माहिती, सौम्य, मध्यम किंवा गंभीर म्हणून एखाद्या स्थितीचे परीक्षण कसे करावे आणि त्या केसेसना योग्य सुविधांकडे कसे सोपवावे यांचा समावेश आहे. 

 त्याचप्रमाणे या प्रोग्राम्समध्ये कोविडसंबंधी एकंदरीत परिस्थिती हाताळली जाण्यासाठी आयसोलेशन सेंटर्स, क्वारंटाईन सेंटर्स यासारख्या विविध आवश्यक सुविधांच्या व्यवस्थापनाविषयी तसेच सौम्य प्रमाणात आजारी रुग्णांवरील उपचार व सर्व्हिस एरियांच्या व्यवस्थापनाची देखील माहिती दिली जाणार आहे.

या प्रशिक्षणाच्या दोन पद्धती उपलब्ध करवून देण्यात आल्या आहेत, एक म्हणजे लाईव्ह वेबिनार्स किंवा दुसरी पद्धत म्हणजे आधी तयार करण्यात आलेल्या मॉड्युल्समार्फत प्रशिक्षण घेता येऊ शकते.  लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स किंवा मोबाईल फोन्सवर हे वेबिनार्स आणि मोड्यूल्स पाहता येऊ शकतात. अधिक माहितीसाठी  http://tatatrusts.org/ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

tata trust will provide training to health workers read full story  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com