खोपोली-पेण राज्य मार्गावर टॅक्‍सीला-हायड्राची धडक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

जीवित हानी नाही; टॅक्‍सीचे नुकसान

खालापूर : प्रवासी उतरण्यासाठी थांबलेल्या टॅक्‍सीला भरधाव हायड्राची धडक बसून अपघात झाल्याची घटना खोपोली-पेण राज्य मार्गावर घडली. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले, तरी टॅक्‍सीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

रविवारी (ता. 18) दुपारी 3 च्या सुमारास किरण अनंत पाटील (41, रा. आत्करगाव, ता. खालापूर) हे त्यांची इको टॅक्‍सी क्र. एमएच 46 बीएफ 3930) घेऊन खोपोली फाटा ते वावोशी असे प्रवासी घेऊन जात होते. तांबाटी गावानजीक प्रवाशांना उतरण्यासाठी किरण यांनी इंडिकेटर देऊन रस्त्यालगत टॅक्‍सी थांबवली असता त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या हायड्रा (क्र. एमएच 46 बीके 7027)च्या चालकाला टॅक्‍सीचा अंदाज न आल्याने हायड्राची टॅक्‍सीला जोरदार धडक बसली.

या धडकेत टॅक्‍सीची मागील बाजू पूर्णपणे दबली जाऊन टॅक्‍सीचा चालक बाजूचा दरवाजा तुटून खाली पडला. या वेळी हायड्राचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी अतिवेगाने हायड्रा चालवून निष्काळजीपणामुळे अपघात केल्याप्रकरणी भा दं वि. कलम 279 मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार प्रशांत म्हात्रे तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taxi-Hydra accident on Khopoli-Penn State route