टॅक्‍सीतील चोरटी वाहतूक आरटीओच्या नजरेआड

तुषार अहिरे
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

मुंबई - पूर्व मुक्त मार्गावरील टॅक्‍सीच्या भीषण अपघाताने गाव-खेड्यांप्रमाणे मुंबईतही गाडीत जादा प्रवासी कोंबण्यात येत असल्याचे वास्तव समोर आले आहे. अपघात होण्याच्या विविध कारणांमध्ये टॅक्‍सीतील जादा प्रवाशी हेसुद्धा एक कारण असल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे, पण अवैध प्रवासी वाहतुकीत शहरातील टॅक्‍सी दुर्लक्षित असल्याची बाब आकडेवारीतून उघड झाली आहे.

मुंबई - पूर्व मुक्त मार्गावरील टॅक्‍सीच्या भीषण अपघाताने गाव-खेड्यांप्रमाणे मुंबईतही गाडीत जादा प्रवासी कोंबण्यात येत असल्याचे वास्तव समोर आले आहे. अपघात होण्याच्या विविध कारणांमध्ये टॅक्‍सीतील जादा प्रवाशी हेसुद्धा एक कारण असल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे, पण अवैध प्रवासी वाहतुकीत शहरातील टॅक्‍सी दुर्लक्षित असल्याची बाब आकडेवारीतून उघड झाली आहे.

अवैध वाहतूक करणाऱ्या बस, खासगी गाड्या व टॅक्‍सींवर परिवहन विभागाची नजर असते. दोषी आढळल्यास वाहनचालकाचा परवाना व गाडीचे परमिट रद्द करण्यात येते. शनिवारी (ता. 5) सकाळी पूर्व मुक्त मार्गावर झालेल्या अपघातात टॅक्‍सीत नऊ जण कोंबले होते. हा अतिरिक्त भारच प्रवाशांच्या जीवावर बेतला. मुळात अवैध वाहतुकीत काळी-पिवळी टॅक्‍सी दुर्लक्षित आहे. मध्यंतरी वडाळ्यातील शेअर टॅक्‍सीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी कोंबले जात असल्याची तक्रार आल्यानंतर ताडदेव आरटीओने धाडसत्र अवलंबले. आरटीओ अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार वर्षभरात दक्षिण मुंबईच्या हद्दीतील हा सर्वांत भीषण अपघात आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या घटनांचा तपास ताडदेव आरटीओने सुरू केला आहे.

अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात कारवाई
1 एप्रिल ते 31 ऑक्‍टोबर 2016

वडाळा आरटीओ
बस- 554
ताब्यात- 72
निकाली- 255
करवसुली- 30 लाख 13 हजार 371
दंड- 17 लाख 33 हजार 600
परवाना रद्द- 214
परमिट रद्द- 214

खासगी वाहने- 154
ताब्यात- 11
निकाली- 37
कर वसुली- 64 हजार 374 रुपये
दंड वसुली- 1 लाख 96 हजार 700 रुपये
परवाना किंवा परमिट रद्द- 37

ताडदेव आरटीओ
एकूण वाहने- 285
टॅक्‍सींची संख्या- अंदाजे 90
महसूल- 8 लाख 11 हजार 27 रुपये

ही चोरटी वाहतूक होती. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी टॅक्‍सीत नेणे हे गैर आहे. हा अपघात केवळ अतिरिक्त प्रवाशांमुळे झाला नसून, अन्य कारणे अहवालातून पुढे येतील.
- गोविंद सैंदाणे, प्रादेशिक परिवहन अधिकारी (ताडदेव आरटीओ)

टॅक्‍सीचा परवाना रद्द होणार
अल्पवयीन मुलाने टॅक्‍सी चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मूळ मालकाचा परवानाच रद्द करण्याचा निर्णय नुकताच परिवहन प्राधिकरणाने घेतला होता. या प्रकरणातही मूळ टॅक्‍सीचालकाचा परवाना रद्द होण्याची शक्‍यता आहे. मुंबईट परमिटधारकांपेक्षा चालक म्हणून टॅक्‍सी चालवणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

Web Title: taxi illegal transport ignored by rto