समायोजन झालेल्‍या शिक्षकांवर निवडणुकीचा भार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

मुंबई - अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन पर्यायी शाळांमध्ये करण्यात आले आहे. अशा ४७ शिक्षकांना अध्यापनाचे तास वगळून उर्वरित वेळेत निवडणुकीचे काम पाहावे, असे आदेश उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

बिगर अल्पसंख्याक शाळांतील शिक्षक व १२ अल्पसंख्याक शाळांतील शिक्षक असे एकूण ४७ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण झाले आहे. या शिक्षकांना समायोजित शाळांत हजर राहण्यास कळवले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मतदान केंद्रांवरील अधिकारी घरोघरी जाऊन मतदार याद्यांतील त्रुटी दूर करण्याचे काम करत आहेत. 

मुंबई उपनगर जिल्ह्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने बिगर अल्पसंख्याक व अल्पसंख्याक शाळांतील समायोजन झालेल्या अतिरिक्त शिक्षकांना अध्यापनाचे तास वगळून उर्वरित वेळेत निवडणुकीचे काम करण्याचे आदेश मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान, शिक्षकांना निवडणुकीचे काम देऊ नये, अशी मागणी मुंबई माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

दहावीची परीक्षा जवळ आल्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करून घ्यायचा आहे. म्हणून समायोजन झालेल्या शिक्षकांना निवडणुकीचे काम देऊ नये, या मागणीसाठी मुंबई माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेऊन योग्य निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले आहे.
- प्रशांत रेडीज, सचिव, मुंबई माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटना

Web Title: Teacher Election Load