'आयपीएल'दरम्यान शिक्षिकेचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

मुंबई - आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स संघांदरम्यानचा सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये गेलेल्या पालिका शाळेतील शिक्षिकेचा विनयभंग करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. गेंदराज सतनामी (वय 26) असे त्याचे नाव आहे. 22 वर्षांची ही शिक्षिका काही विद्यार्थ्यांना घेऊन हा सामना पाहण्यासाठी गेला होती. सामना संपल्यानंतर गेंदराज पाणी घेऊन त्यांच्याजवळ आला. पाणी नको असल्याचे शिक्षिकेने सांगूनही त्याने जबरदस्तीने पाणी देण्याचा, तसेच शिक्षिकेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिक्षिकेने आरडाओरड केल्यावर पोलिसांनी तातडीने दखल घेत गेंदराजला अटक केली.
Web Title: teacher molestation in IPL