शिक्षकाचा तरुणीवर लैंगिक अत्याचार

File Photo
File Photo

नवी मुंबई : खारघरमधील एका नामांकित खासगी शिकवणीमध्ये काम करणाऱ्या १८ वर्षीय तरुणीवर, त्याच क्‍लासमधील व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

दीपेश जैन असे या व्यक्तीचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या प्रवक्‍त्या आमदार मनीषा कायंदे यांनी या घटनेचा निषेध करून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

पीडित तरुणी ही कोपरखैरणे भागातील असून, ती वाशीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे ती गेल्या ऑगस्ट महिन्यापासून नेरूळ येथील एका खासगी शिकवणीमध्ये सुपरवायझर म्हणून पार्टटाईम काम करत होती. गत २२ सप्टेंबरला तिला खारघर येथील क्‍लासेसमध्ये पाठविण्यात आले होते. त्यावेळी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ती घरी जाण्यासाठी निघाली असताना दीपेश जैन याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

यावेळी पीडित तरुणीने प्रतिकार करीत स्वत:ची सुटका करून घेतली. तसेच याबाबत क्‍लास व्यवस्थापनाला माहिती दिली. मात्र, त्याची कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे पीडित तरुणीने अखेर मंगळवारी आपल्या आईसह खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानुसार पोलिसांनी आरोपी दीपेश जैन याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, पोलिस या याबाबत अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, तपास सुरू असल्याने अद्याप या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली नसल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विवेक भोईर यांनी दिली.

तत्काळ कठोर कारवाईची मागणी
शिवसेनेच्या प्रवक्‍त्या आमदार डॉ. मनीषा कोयंदे यांनी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय कुमार यांना लेखी पत्र पाठवून या घटनेतील दोषींवर, तसेच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्‍लास व्यवस्थापनावर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com