विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक निलंबित

दिनेश गोगी
शनिवार, 14 जुलै 2018

उल्हासनगर : इयत्ता 7 वी पास झालेली विद्यार्थीनी शाळा सोडण्याचा दाखला घेण्यासाठी आली असता वासनांध भावनेने तिचे हात दाबणाऱ्या एक 54 वर्षीय शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकाराला उल्हानगर पालिकेने गांभीर्याने घेतले असून आयुक्त गणेश पाटील यांच्या आदेशान्वये मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांनी विजय धंदर नावाच्या शिक्षकाला तडकाफडकी निलंबित केल्याने धंदर यांच्या कारकिर्दीला गालबोट लागले आहे. हा शिक्षक मंत्रालयातून सेवानिवृत्त झालेल्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा नातलग आहे.

कॅम्प नंबर 1 मध्ये उल्हासनगर पालिकेची 27 क्रमांकाची शाळा आहे.याशाळेतील इयत्ता 7 वि पास झालेली विद्यार्थीनी तिचा शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी काल सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शाळेत गेली असता,मुख्याध्यापक राजेंद्र सोनवणे हे रजेवर होते.त्यामुळे शिक्षक विजय धंदर यांना दाखला देण्यास सांगण्यात आले.तेंव्हा धंदर यांनी तिच्या हाताला वासनांध भावनेने दाबण्यास सुरवात केली. या शिक्षकाच्या तावडीतून कशीबशी सुटका करणाऱ्या विद्यार्थीनीने हा प्रकार घरी येऊन तिच्या पालकांना सांगितला. संतप्त झालेल्या पालकांनी जमावा सोबत शाळेत धाव घेतली.हा प्रकार समजताच शिक्षण मंडळाच्या लेखापाल निलम कदम-बोडारे,मुख्याध्यापक राजेंद्र सोनवणे यांनी शाळा गाठली.वातावरण चिघडले.चूक कबूल करताना धंदर यांनी माफीनामा लिहून दिला.पण जमाव शांत होत नव्हता. हा धक्कादायक प्रकार समजताच  पालिका मुख्यालयात जाताच आयुक्त गणेश पाटील यांच्या आदेशान्वये मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांनी मुख्याध्यापक राजेंद्र सोनवणे यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन विजय धंदर यास तडकाफडकी निलंबित केले.

"लाईट बंद नसती तर धंदरचे कारनामे सीसीटीव्हीत कैद झाले असते
उल्हासनगरात विजेचा तासंतास लपंडावाचा खेळ सुरू आहे. मुख्याध्यापकाच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरा आहे.पण काल वीज बंद होती.अन्यथा धंदरचे कारनामे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असते.
दरम्यान शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.दुर्दैवाने काल शुक्रवारी विजे अभावी कॅमेरा बंद होता.त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न झाला.तासंतास जर विद्युत पुरवठा खंडित होत असेल तर शाळांमध्ये जनरेटरची व्यवस्था पालिकेने करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख,मनवीसेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांनी केली.विनयभंगाचा घडलेला संतापजनक प्रकार पाहता विद्यार्थिनींचे दाखले हे वरिष्ठ शिक्षकांच्या माध्यमातून देण्यात यावे असेही देशमुख,शेलार यांनी सांगितले.

Web Title: teacher suspended who molest girl