"तुझा अभ्यास झालेला नाही, तू थांबून अभ्यास पूर्ण कर" म्हणाला, मग बाकीचे घरी गेल्यावर...

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 मार्च 2020

आपल्या समाजात किती विकृती आहे याची कल्पना आपल्याला दररोज प्रकाशित कोणाच्या बातम्यांमधून येतंच असते. विकृत माणसं कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. पुन्हा एकदा अशीच एक भयंकर आणि अंगावर शहारा आणणारी घटना टिटवाळ्यात घडली आहे.

टिटवाळा : आपल्या समाजात किती विकृती आहे याची कल्पना आपल्याला दररोज प्रकाशित कोणाच्या बातम्यांमधून येतंच असते. विकृत माणसं कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. पुन्हा एकदा अशीच एक भयंकर आणि अंगावर शहारा आणणारी घटना टिटवाळ्यात घडली आहे.

COVID19 - 'ती' एक टॅक्सी 'कोरोना' घेऊन फिरत होती मुंबईच्या रस्त्यांवरून...

टिटवाळ्यातील म्हारळ गावात खासगी शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षकाने राहिलेला अभ्यास पूर्ण करून देण्याच्या बहाण्याने आठवीतील मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून संबंधित शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. 

म्हारळ गावातील "गॅलेक्‍सी' या 5 वी ते 10 वीपर्यंतच्या शिकवणीत सुमारे दीडशे विद्यार्थी आहेत. शिकवणीचा शिक्षक तानाजी सावंतने (रा. म्हारळ) आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला "तुझा अभ्यास अपूर्ण आहे. तू थांबून पूर्ण कर' असे सांगितले. इतर सर्व विद्यार्थी घरी गेल्यानंतर सावंतने तिचा विनयभंग केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे ती घाबरली. 

#COVID19 'हा' रिपोर्ट वाचा आणि कोरोनाबद्दलची भीती मनातून काढून टाका

दुसऱ्या दिवशी मुलीने शिकवणीला जाण्यास टाळाटाळ करत होती. त्यानंतर तिच्या पालकांनी तिच्याकडे विचारणा केली. त्यानंतर रडत तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी तातडीने टिटवाळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तानाजी सावंत विरोधात "पोक्‍सो'अंतर्गत आरोपीला अटक केली असून 18 मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

teacher from titwala arrested under pocso act for doing obscene behavior with girl


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teacher from titwala arrested under pocso act for doing obscene behavior with girl