पालघर : काळ्या फिती लावून दिवाळी; शिक्षक भरतीसाठी आंदोलन सुरूच

 Strike
StrikeSakal media

पालघर : ऐन दिवाळीत (Diwali Festival) आदिवासी डीटीएड, बीएड पात्रताधारकांचे शिक्षक भरतीसाठी (teachers recruitment) उपोषण सुरू आहे. २६ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या उपोषणाचा (strike) शनिवारी बारावा दिवस होता. आपल्या मागण्यांची प्रशासनाकडून (government) दखल घेण्यात येत नसल्यामुळे शुक्रवारी उपोषणकर्त्यांनी काळ्या फिती (black ribbons) लावून काळी दिवाळी साजरी केली.

 Strike
ठाण्यात फटक्यांमुळे लागल्या सात आगी; दोन दिवसांत २७ आगीच्या घटना

दरम्यान, २३ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले होते. मात्र प्रशासनाला जुनही जाग येत नसल्याची टीका समितीच्या उपाध्यक्षा गीतांजली पानतले यांनी केली. २६ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या उपोषणात खासदार राजेंद्र गावित, आमदार राजेश पाटील, आमदार विनोद निकोले, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार कपिल पाटील, आमदार राजेश पाडवी (नंदुरबार) तथा सदस्य अनुसूचित जनजाती कल्याण समिती महाराष्ट्र, जिल्हा परिषद सदस्य, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक संघटना यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.

गुरुवारी (ता. ४) सकाळी ११ वाजता आयुक्त शालेय शिक्षण विभग अधिकारी विशाल सोळंकी, पवित्र पोर्टल टीम, अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, खासदार तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन बैठक पार पडली. पालघर जिल्ह्यात अनुसूचित जमाती विशेष शिक्षक भरती ऑफलाईन काढण्याबाबत निर्णय झाला.

तसेच हा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अपर मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग वंदना कृष्णा यांना कळवून सोमवार किंवा मंगळवारी शिक्षणमंत्री यांच्या दालनात बैठक लावण्याबाबत चर्चा झाली; परंतु बैठकीत झालेला निर्णय कागदावर जो पर्यंत होत नाही तो पर्यंत उपोषणकर्ते ठाम असल्याचे समितीचे सल्लागार विवेक कुरकुटे यांनी सांगितले आहे.

"आतापर्यंत ज्या बैठका झाल्या त्यात कोणताही ठोस निर्णय झाला नाही. फक्त आश्वासने देऊन उपोषण स्थगित करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे निर्णय जोपर्यंत कागदावर येत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील."

- किरण गोंड, उपाध्यक्ष आदिवासी डीएड, बीएड कृती समिती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com