शिक्षकाची समाजातील भूमिका महत्वाची- खा. राजेंद्र गावीत 

gavit
gavit

सफाळे (पालघर) : समाज परिवर्तनासाठी शिक्षकांची भूमिका खुप महत्वाची असल्यानेच समाजात शिक्षकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो समाजाचा शिल्पकार आहे.एक शिक्षक चुकला तर संपूर्ण पिढी बरबाद होते म्हणूनच शिक्षकांची जबाबदारी ही वाढत आहे असे खासदार राजेंद्र गावीत यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यातील विराथन येथील  मेघराज शिक्षण संस्थेच्या केळवारोड येथील विद्या वैभव विद्यालयाचे मुख्याध्यापक राजय चौधरी यांचा सेवा निवृत्ती सत्कार समारंभ शुक्रवारी (ता. 22) संपन्न झाला. 

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून गावीत बोलत होते.पालघर जिल्हयात अदयावत रूग्णालय उभारण्याचे आपले स्वप्न लवकरात लवकर सत्यात उतरेल असे सांगून पालघर तालुक्यातील अनेक समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाईल असे सांगितले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेघराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती  दामोदर पाटील होते. पाटील यांनी चौधरी यांचे सारखे इमाने इतबारे सेवा करणारया शिक्षकांची समाजाला गरज आहे, असे सांगून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर संस्थेचे कार्यवाह चंदुलाल घरत यांनी शासनाच्या उदासीनतेमुळे निवृत्त शिक्षकांच्या जागी नविन शिक्षक भरती नसल्याने संस्थांना तारेवरची कसरत करावी लागते असे सांगितले. 

सत्कार मूर्ती राजय चौधरी यांनी संस्थेने दिलेल्या संधीमुळे मला माझी प्रगती करता आली. संस्थेचे व दोन्ही शाळांमधील शिक्षकांचे उपकार आयुष्यभर लक्षात राहतील असे सांगून आभार व्यक्त केले.

या वेळी संस्थेचे खजिनदार सुदाम भोईर, सदस्य विनोद मोरे, नरसिंह पाटील,डी. एस. किणी, नयना घरत , शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष पावडे, पालघर-ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष प्रमोद पाटील , आयटी आयचे प्राचार्य नितीन वर्तक परिसरातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, परिसरातील सरपंच, संस्थेचे आजी माजी मुख्याध्यापक, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी,  मेघराज शिक्षण संस्थेच्या अभिनव विद्यालय विराथन व विद्या वैभव विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि चौधरी यांचे कुटूंबिय , नातेवाईक उपस्थित होते. 

31 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेबद्दल चौधरी यांचा संस्था,दोन्ही शाळा,विविध संस्था, सरपंच,नातेवाईक यांच्या हस्ते सपत्निकसत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नरेश किणी यांनी केले तर सूत्रसंचालन महेंद्र पाटील व मनोहर पाटील यांनी केले.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com