'विनाअनुदानित' शिक्षकांचे आंदोलन सुरू 

file photo of Vinod Tawde
file photo of Vinod Tawde

मुंबई : महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने 18 वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू केले. राज्यभरातील शिक्षक यात सहभागी झाल्याने दिवाळीनंतर सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद राहणार आहेत.

सरकार कोणताही निर्णय घेत नाही तोपर्यंत विनाअनुदानित शाळा बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिला आहे. 

मराठी भाषेतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे, 19 सप्टेंबर 2016 चा जाचक सरकारी निर्णय रद्द करावा आदी प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील हजारो शिक्षकांनी आझाद मैदानात ठिय्या मांडला आहे. मुंबईसह राज्यातील औरंगाबाद, पुणे, नगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, परभणी, हिंगोली, धुळे, नंदुरबार, बीड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, नांदेड, जालना, कोल्हापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद, जळगाव येथील शिक्षक आझाद मैदानात दाखल झाले आहेत. शिक्षकांनी येथील शाळा बंद आंदोलन सुरू केल्याने सोमवारपासून सुरू झालेले दहावी आणि स्कॉलरशिपचे जादा तासही बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती विनाअनुदानित शाळा कृती समितीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी दिली. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला. 

कृती समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली; मात्र त्या वेळी कोणताही निर्णय न झाल्याने शाळा बंद आंदोलन सुरूच राहणार आहे. या संदर्भात गुरुवारी शिक्षक आमदार, विनाअनुदानित कृती समितीचे पदाधिकारी, सचिव व मंत्री यांची बैठक होणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. 
- प्रशांत रेडीज, प्रदेशाध्यक्ष, विनाअनुदानित शाळा कृती समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com