उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळेत सेमी-इंग्लिशचे धडे

दिनेश गोगी
शुक्रवार, 11 मे 2018

उल्हासनगर : चालू वर्षात जुलै महिन्यापासून महापौर मीना आयलानी यांच्या आदेशान्वये उल्हासनगर महानगरपालिकेच्या 7 शाळांमध्ये सेमी-इंग्लिशचे धडे गिरवले जाणार आहेत. त्यात मराठी माध्यम-3,हिंदी माध्यम-2 व सिंधी माध्यमाच्या 2 शाळांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाधिकारी भाऊराव मोहिते यांनी दिली.

उल्हासनगर : चालू वर्षात जुलै महिन्यापासून महापौर मीना आयलानी यांच्या आदेशान्वये उल्हासनगर महानगरपालिकेच्या 7 शाळांमध्ये सेमी-इंग्लिशचे धडे गिरवले जाणार आहेत. त्यात मराठी माध्यम-3,हिंदी माध्यम-2 व सिंधी माध्यमाच्या 2 शाळांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाधिकारी भाऊराव मोहिते यांनी दिली.

उल्हासनगरात 28 पालिकेच्या शाळा असून त्यात गोरगरीब गरजू विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना पालिकेकडून शैक्षणिक साहित्य, दप्तरे दिले जातात. मात्र त्यांना इयत्ता पाचवी पासून इंग्लिशचे एबीसीडीचे धडे शिकवले जातात. तर दुसरीकडे खाजगी शाळांत थेट बालवाडी, ज्युनियर व सिनिअर केजी पासूनच इंग्लिश शिकवले जात असल्याने ही मुले झटपट इंग्लिशची भाषा शिकतात. तर पालिकेचे गरीब विद्यार्थी या भाषेपासून उपेक्षित राहतात. अशा गोरगरीब विद्यार्थ्यांना देखील इयत्ता पहिली पासूनच इंग्लिशचे ज्ञान प्राप्त व्हावे या सकारात्मक उद्देशाने महापौर मिना आयलानी यांनी त्यांच्या दालनात बैठक आयोजित केली. उपमहापौर जीवन इदनानी, सभागृहनेते जमनादास पुरस्वानी, नगरसेवक मनोज लासी, सुनील सुर्वे, सुरेंद्र सावंत, प्रदिप रामचंदानी, नगरसेविका मीना सोंडे यावेळी उपस्थित होते.

महापौर आयलानी यांनी विद्यार्थ्यांच्या इंग्लिश भाषेच्या ज्ञानात भर पडावी यासाठी पालिकेच्या शाळांत सेमी-इंग्लिश सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सुरवातीला 3 मराठी आणि हिंदी व सिंधी प्रत्येकी 2 अशा सात शाळांमध्ये जुलै महिन्यापासून सेमी-इंग्लिश सुरू करण्यात येत असल्याचे प्रशासनाधिकारी भाऊराव मोहिते यांनी सांगितले. 

मनवीसेच्या पाठपुराव्याला यश
दरम्यान पालिकेच्या शाळांत इयत्ता पहिली पासून सेमी-इंग्लिश व ई-लर्निंग सुरू करावी अशा मागणीचा पाठपुरावा मनवीसेने सातत्याने केला होता.त्यानुसार पालिका अधिकारी व शिक्षण मंडळाचे तत्कालीन उपायुक्त जमीर लेंगरेकर तसेच मनवीसेच्या संयुक्तिक बैठकीत सेमी-इंग्लिश व ईलर्निंग सुरू करण्यासाठी हिरवा कंदिल दाखवण्यात आला होता.

तसे इतिवृत्त 1 एप्रिल 2017 रोजी जारी करण्यात आले होते.त्यास महापौर मीना आयलानी यांनी सकारात्मक घेतले असून आता सेमी-इंग्लिश सुरू होणार असल्याने गरीब विद्यार्थी इयत्ता पहिली पासून इंग्लिशचे धडे गिरवणार आणि त्यांना भाषेचे ज्ञान लवकर उपलब्ध होणार.असा विश्वास सेमी-इंग्लिश साठी पाठपुरावा करणारे मनवीसेचे उपाध्यक्ष तथा मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख,मनवीसे शहराध्यक्ष मनोज शेलार यांनी व्यक्त केला.

Web Title: teaches semi english in ulhasnagar municipal corporation schools