mumbai
mumbai

चांगल्या कर्णधारामुळेच संघ यशस्वी ठरतो- सुभाष भोईर

डोंबिवली - कर्णधाराने स्वतःबरोबरच संपूर्ण संघ सदस्यांना योग्य मार्गदर्शन करुन चांगले प्रदर्शन केले तर यश मिळते. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उत्कृष्ट कर्णधार आहेत, त्यांचे नेतृत्व व दूरदृष्टी चांगली आहे. त्याचप्रमाणे उपकर्णधार म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व जिल्ह्याला मिळाले आहे. त्यांच्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्हा शिवसेनेने भगवामय करून दाखवला आहे. ग्रामीण विभागात शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे काम होत आहे म्हणूनच सत्ता आहे. कोणीही एकटा कधीही लढाई जिंकत नाही. टीममुळे कामे चांगली होत असतात आणि त्यासाठी कॅप्टन चांगला पाहिजे असे वक्तव्य आमदार सुभाष भोईर यांनी केले.

डोंबिवली जवळील खोणी गावातील शिवसेनेच्या शाखेत आमदार सुभाष भोईर यांनी स्वखर्चातून संगणक व प्रिंटरच्या माध्यमाने शाखा डिजिटल केली. त्या संगणीकृत शाखेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते रविवारी दुपारी पार पडले त्यावेळी बोलताना ते म्हणाले सध्या स्पर्धेचे युग सुरु  आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्या वेळेत सोडविण्यासाठी शिवसेनेच्या शाखा सुद्धा डिजिटल व्हायला पाहिजेत. याच उद्देशाने ग्रामीण विभागातील 40 शाखा संगणीकृत तंत्रज्ञानाने सज्ज करणार आहे.हि आठवी ग्रामीण शाखा डिजिटल होत आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेली खोणी शाखा पूर्णपणे संगणीकृत होत असून आता सैनिकांना आणि खोणी गावातील ग्रामस्थांना त्याचा लाभ घेता येणार आहे.

शिवसेनेच्या खंबीर नेतृत्वामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दोन्ही जागा मोठ्या फरकाने शिवसेनेने जिंकल्या,त्याला खोणी पंचक्रोशीतील  शिवसैनिकांची मोठी साथ मिळाली. पुढचा सरपंच जनतेने निवडायचा आहे ,तो देखील सेनेचाच असणार असा विश्वास व्यक्त करतानाच चांगली लोकोपयोगी कामे कशी करायची हे आम्हाला चांगलेच माहित आहे असे भोईर म्हणाले. नाबार्डकडूनही वडवली पुलाच्या विकास कामासाठी दीड कोटी निधी मिळाला आहे. अनेक विकासाची कामे ग्रामीण विभागात होत असून त्या कामांचे लोकार्पण झाले आहे. सर्वांनी मिळून कोणतेही काम केलं तर त्याच्यात आनंद असतो. काम करण्यासाठी कर्तुत्व असायला लागत नुसत देवाचं नांव असून चालत नाही असा टोलाही त्यांनी स्थानिक विरोधकांना लगावला. यावेळी तालुकाप्रमुख एकनाथ शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, पंचायत समिती सदस्य किरण ठोंबरे, गणेश ठोंबरे, शाखाप्रमुख गुरुनाथ पाटील, उपशाखाप्रमुख वासुदेव ठोंबरे, विभागप्रमुख नेताजी पाटील, चैनु जाधव, शिवाजी फराड, वासुदेव पाटील आणि उपस्थित होते.

या कार्यक्रमा नंतरआमदार सुभाष भोईर यांच्या आमदार निधीतून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 86 मधील पिसवली टाटा पावर, जय भीम नगर, शांती नगर, गांधी नगर येथील गटार व पायवाट करण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कामासाठी दहा लाख  रुपयांचा आमदार निधी देण्यात आला. त्यावेळी स्थानिक नगरसेविका सुनीता खंडागळे, नगरसेवक महेश गायकवाड, उपतालुकाप्रमुख विलास भोईर, परिवहन सदस्य मनोज चौधरी, विभागप्रमुख सुखदेव पाटील, रघुनाथ माळी, युवासेना कल्याण तालुका अधिकारी योगेश म्हात्रे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com