मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड; लोकल वाहतूक विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

दरम्यान कल्याण मधील जीर्ण पत्रिपुल पाडण्यासाठी काल रविवारी मध्य रेल्वेवर सुमारे सहा तासाचा मेघा ब्लॉक, ओला,उबर संप आणि आजचा तांत्रिक बिघाड प्रवाशांसाठी गैरसोयीचा ठरत आहे.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील सिएसएमटी-कल्याण रेल्वे मागावरील कांजूर मार्ग रेल्वे स्थानकावर आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप-डाउन मार्गावरील लोकल 10 ते 15 मिनिटाने उशिरा धावत असतांना मध्य रेल्वे प्रशासनाने मात्र बिघाडीचे कारण स्पष्ट केले नाही.

lay.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal&hl=en" target="_blank">सकाळचे मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

राज्याचे पहिले हिवाळी अधिवेशन मुंबईत आज पासून सुरू होणार आहे. त्यातच आठवड्याच्या पहिल्या दिवशीच वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. कुर्ला-मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. मात्र नेमका काय बिघाड झाला आहे. याची अधिकृत माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून कडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत असून प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. 

दरम्यान कल्याण मधील जीर्ण पत्रिपुल पाडण्यासाठी काल रविवारी मध्य रेल्वेवर सुमारे सहा तासाचा मेघा ब्लॉक, ओला,उबर संप आणि आजचा तांत्रिक बिघाड प्रवाशांसाठी गैरसोयीचा ठरत आहे.

Web Title: technical fault on central railway in Mumbai