लोकलमध्ये तांत्रिक बिघाड; ट्रान्सहार्बर ठप्प

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

ट्रान्स हार्बर मार्गावर लोकलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे ऐरोली-ठाणे अप मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावर लोकलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे ऐरोली-ठाणे अप मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दुपारी 2.20 वाजण्याच्या सुमारास बिघाड झाल्यामुळे ठाणे जाणार्या लोकलचा खाेळंबा झाला. 

दुपारी ऐन गर्दीच्या वेळी नेरूळहून सुटणारी ठाणे लोकलमधील युनिटमध्ये बिघाड झाल्यामुळे ऐरोली ते ठाणे लोकल ठप्प झाली. परिणामी, अप-डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल ठप्प झाली आहे. दरम्यान दुरूस्तीचे कामे सुरू असून लवकरच या मार्गावरील लोकल सुरू करण्यात येतील असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: technical problem in trans harbor local line