एचआयव्हीबाधित तरुणीवर सामूहिक बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

मुंबई : एचआयव्हीबाधित तरुणीवर चेंबूर परिसरात चार तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा उघड झाला आहे. पीडित तरुणी औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार घेत असून, हे प्रकरण चुनाभट्टी पोलिस ठाण्यात वर्ग होण्याची शक्‍यता आहे. याबाबतची कागदपत्रे अद्याप चुनाभट्टी पोलिसांना मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.

मूळची जालन्यातील रहिवासी असलेली 19 वर्षीय तरुणी मुंबईत भावासोबत राहते. प्रकृती अचानक बिघडल्याने तिला मंगळवारी रात्री औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे उपचारादरम्यान केलेल्या चौकशीत समजले. या प्रकरणी 30 जुलैला पोलिसांत तक्रार दाखल झाली. हा गुन्हा मुंबईत घडला असल्यामुळे 31 जुलैला फिर्यादीची प्रत व संबंधित कागदपत्रे मुंबई पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, हे प्रकरण अद्याप चुनाभट्टी पोलिसांकडे सोपवण्यात आले नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मैत्रिणीच्या वाढदिवसाची पार्टी झाल्यावर ही तरुणी रात्री घरी निघाली होती. त्यावेळी चार जणांच्या टोळक्‍याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून पळ काढला. त्यानंतर घरी गेलेली ही तरुणी भोवळ येऊन कोसळली. घाबरलेल्या स्थितीत तिने औरंगाबाद गाठले. डॉक्‍टरांनी उपचारादरम्यान तिच्या वडिलांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे सांगितले. त्यानंतर तिच्या वडिलांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मेंदूज्वर झाल्यामुळे पीडित तरुणीची प्रकृती गंभीर असून, तिचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teen girl rape in chembur mumbai