आता सातवीपासून किशोरवयीन शिक्षण 

आता सातवीपासून किशोरवयीन शिक्षण 

मुंबई - किशोरवयात शारीरिक बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्‍न निर्माण होत असतात. अनेकदा त्यावर उघडपणे बोलले जात नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे मिळावीत, यासाठी किशोरवयीन प्रशिक्षण इयत्ता नववीऐवजी सातवीपासून देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. 

किशोरवयीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पालिकेच्या शाळांमधील इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांना किशोरवयात होणारे मानसिक, शारीरिक बदल तसेच प्रजनन संस्था, एचआयव्ही (एड्‌स) आदी विषयांबाबतची माहिती देण्यात येते, परंतु सध्याच्या काळात मुला-मुलींची पौगंडावस्था ही सातव्या इयत्तेपासूनच होत असल्याचे सर्वेक्षणातून आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या संशोधनातून दिसून आले आहे. त्यामुळे किशोरवयीन प्रशिक्षण कार्यक्रम इयत्ता नववीऐवजी सातवीपासूनच सुरू करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. प्रशासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून या प्रशिक्षण कार्यक्रमाची नियमित अंमलबजावणी केली जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक शाळेमध्ये एक वैद्यकीय अधिकारी, एक आरोग्य परिचारिका आणि एक शिपाई यांचे पथक विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले जाते. आता हा कार्यक्रम सातवीच्या विद्यार्थ्यांसाठीही सुरू केला जाणार असल्याने मुलांच्या मनातील शंकांचे निरसन होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com