कथा अभिवाचन व कथाचित्र स्पर्धेला तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद

कथा अभिवाचन व कथाचित्र स्पर्धेला तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद

मुंबई: सध्या युट्यूब, फेसबुक, ट्विटर, इंटाग्राम अशा सोशल मीडियामुळे प्रत्यक्ष पुस्तक वाचनापासून तरुणाई दूर जात आहे. तरूणाईला प्रत्यक्ष वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी सकाळ माध्यम समुहच्या यिनबझ, ग्रंथाली प्रकाशन, ठाणे आर्ट गिर्ल्ड(टॅग), किर्ती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज दादर येथील किर्ती महाविद्यालयात कथा अभिवाचन व कथाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने तरुणाईने आपला उत्स्फुर्त सहभाग नोंदवला.

खुला व महाविद्यालयीन अशा दोन गटात स्पर्धा संपन्न झाली. १५ वर्षापासून ते ८० वर्षापर्यंतच्या स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने स्पर्धक आले होते.

यावेळी ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर,संयोजक धनश्री धारप, अरुण जोशी, प्रल्हाद जाधव, ठाणे आर्ट गिर्ल्डचे सोनाली लोहार, डॉ.निर्मोही फडके, सुनीता फडके, प्राचार्य डी. व्ही.पवार, धनश्री करमरकर, योगेश खांडेकर, राजश्री गढीकर, वृंता दाभोळकर, विशाल मोटे, मुंबई दूरदर्शनचे माजी संचालक डॉ. याकूब सईद उपस्थित होते.


कथाचित्र एक वेगळा प्रयोग

कथा अभिवाचन सुरु असतांना चित्रकारने त्याच कथेवर चित्र रेखाटणे हा एक वेगळा प्रयोग यावेळी करण्यात केला. स्पर्धक कथा वाचत होते, त्यावेळी चित्रकार आपल्या कॅनव्हॉसद्वारे कथेचे चित्र रेखाटत होते. अत्यंत सुंदर अशी कलाकृती यावेळी चित्रकारांनी काढली.

गेल्या चार वर्षापासून ग्रंथाली अभिवाचन स्पर्धा घेत आहे. यावर्षीपासून कथाचित्र स्पर्धेला सुरुवत केली आहे. ७० स्पर्धकांनी सहभाग घेतला.यातील काही स्पर्धाकांची चित्रे निवडली जातील.२५ डिसेंबरला कीर्ती महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांचे प्रदर्शन भरवणार आहे. त्या कार्यक्रमात विजेत्यांना पारितोषिक दिले जाईल. स्पर्धेला प्रतिसाद पाहून  संपुर्ण राज्यात हा कार्यक्रम घेण्याचा मानस आहे.
- सुदेश हिंगलासपूरकर, ग्रंथाली प्रकाशन, विश्वस्त


आम्ही वेगवेगळ्या लेखकांच्या कथा निवडल्या आहेत. त्या कथेवर चित्रकारांना चित्र रेखाटायचे आहे. या स्पर्धेत मोठा प्रदिसाद मिळाला आहे.बेळगाव, जळगाव, रायगड, नगर, नाशिक, पुणे,ठाणे येथून स्पर्धक आले आहेत.
- सोनाली लोहार, ग्रंथगंध विभाग प्रमुख, ठाणे आर्ट गिर्ल्ड.

विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचण्याचे प्रमाण कमी झाल आहे. वाचन संस्कृती वाढावी हा उद्देश कार्यक्रम घेण्यामगाचा आहे.अभिवाचन स्पर्धेत तरुणांनी लक्षणीय सहभाग घेतला त्यावरुन वाचनाची आवड तरुणाईत रुजत आहे हे सिद्ध होते.
-डी. व्ही. पवार, प्राचार्य, कीर्ती महाविद्यालय, दादर


संपदा जोगळेकर- कुलकर्णी यांची "तडा" ही कथा अत्यंत सुंदर कथा आहे. गावातील अंधश्रद्धेवर भाष्य करणारी ही कथा आहे. गावात एक मंदीर असते. मंदिराजवळ एक झाड असते. तेथे अनेक नैसर्गिक घटना घडतात. त्यामुळे मंदिराला तडा जातो, ही घटना म्हणजे देवाचा कोप झाला, अशी गावकऱ्यांची समज असते. काही तरुण या घटना विज्ञानाच्या आधार उलगडतात त्यामुळे अंधश्रद्धेला तडा जातो. यावर भाष्य करणार हे चित्र आहे.
- कृषिता सालीयन, चित्रकार, स्पर्धक.

web title : Teenagers spontaneous response to story competition

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com