पालकमंत्र्यांची वेळ मिळाल्यावर तेजस्विनी रस्त्यावर धावणार

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मिळत नसल्याने या बसेसचा लोकार्पण सोहळा लांबला आहे.
 City Bus
City Bussakal

डोंबिवली : कल्याण ( kalyan) डोंबिवलीतील (Dombivli) महिलांना सुखकर व सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्याचा दृष्टीने कल्याण डोंबिवली महापालिका (kalyan dombivli municipal corporation) परिवहन सेवेच्या ताफ्यात तेजस्विनीच्या चार बस दाखल झाल्या आहेत. उशिरा का होईना महिलांना या सेवेचा लाभ मिळणार आहे. बस मार्गस्थ करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून पालकमंत्री एकनाथ शिंदे (Guardian Minister Eknath Shinde) यांची वेळ मिळत नसल्याने या बसेसचा लोकार्पण सोहळा लांबला आहे.

महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकारने महिला प्रवाशांसाठी तेजस्विनी बस योजना सुरू केली आहे. मुंबई, ठाणे शहरात ही सुविधा कधीच सुरू झाली, मात्र कल्याण डोंबिवलीकर महिला प्रवासी या बसच्या प्रतीक्षेत आहेत. 2018 साली कल्याण डोंबिवलीसाठी तेजस्विनीच्या चार बस मंजूर झाल्या होत, भांडवली खर्च म्हणून सरकारकडून उपक्रमाला 1.20 कोटी मंजूर झाले आहेत. परंतू बस खरेदीसाठी पाच ते सहा वेळा निविदा काढूनही प्रतिसाद मिळत नसल्याने हा निधी पुन्हा जाण्याची भीती होती.

 City Bus
तरुणीच्या लग्नाला विरोध करणाऱ्या आरोपीचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला

अखेर तीन वर्षांनी फेब्रुवारी 2021 मध्ये निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला आणि तेजस्विनी केडीएमटीच्या ताफ्यात दाखल झाली. तसेच बसवर वाहक म्हणून 12 महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डोंबिवली निवासी, लोढा पलावा, कल्याण मोहना आणि रिंगरूट मार्गावर महिला प्रवाशांची संख्या जास्त असून सुरवातीला या मार्गावर ही बस चालविण्यात येणार आहे. तसेच या बसची नोंदणी प्रक्रियाही पूर्ण झाली असल्याचे परिवहन विभागाकडून कळविण्यात आले आहे.

 City Bus
आशियाई महिला फुटबॉल स्पर्धा; दुरुस्तीच्या खर्चाला स्थायी समितीची मंजूरी

बसची नोंदणी प्रक्रिया ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला सुरू झाल्याने आठवड्याभरात हे काम होऊन तेजस्विनी बस येत्या 15 ऑगस्टला रस्त्यावर धावतील अशी महिला प्रवाशांना आशा होती. मात्र अद्याप बस सुरू झालेल्या नाहीत. आता ठाण्याचे पालकमंत्री या बस मार्गस्थ करण्यासाठी कधी वेळ देतात हे पहावे लागेल.

 City Bus
'या' लायसन्ससाठी मुंबईत तीन महिन्यांचे वेटिंग; ऑनलाईन समस्येमुळे अडचणी

बसचे रजिस्ट्रेशन चे काम पूर्ण झाले आहे. पालकमंत्री यांची वेळ घेऊन लवकरच बसचे उद्धाटन करण्यात येईल.

दीपक सावंत, व्यवस्थापक कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com