आठवडाभर मुंबई घामाघूम

आठवडाभर  मुंबई घामाघूम

मुंबई : मुंबईत आज ३५.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले असून पुढील मंगळवारपर्यंत अशीच परिस्थिती राहाणार आहे; तर ठाणे, डहाणू आणि रायगड जिल्ह्यातही तापमानाचा पारा वरच राहणार आहे. 

भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून अद्याप त्याचा महामुंबईवर परिणाम दिसलेला नाही. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. सांताक्रूझ येथे आज कमाल ३५.९ आणि किमान २४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे; तर अलिबागमध्ये ३३.६ आणि २४.९, ठाण्यात ३४.६ आणि २५ अंश सोल्सिअस, डहाणूत ३४.६ आणि २५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील तीन दिवस तापमान असेच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईत उन्हाचा उकाडा वाढल्याने घामाच्या धारा वाहत आहेत. स्कायमेट संस्थेच्या अंदाजानुसार मंगळवारपर्यंत तापमान वाढून ३७ अंशापर्यंत पोहचेल. किमान तापमानही २६ अंशावर असेल. तर, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर महामुंबईत पावसाच्या तुरळक सरी कोळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com