ठाकुर्ली येथे टेम्पोची रेल्वे क्रॉसिंग गेटला धडक

संजीत वायंगणकर
शनिवार, 14 एप्रिल 2018

डोंबिवली : रेल्वे गेट बंद होण्याआधी पुढे जाण्याच्या धडपडीत चालकाचा अंदाज चुकल्याने अपघातात लोखंडी गेट पूर्णपणे वाकले. शनिवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास ठाकुर्ली रेल्वे क्रॉसिंगजवळ एम एच 04 / एच डी / 3025 क्रमांकाच्या एका टेम्पोने रेल्वे गेटलाच धडक दिली. यात कोणतीही हानी झाली नाही.

डोंबिवलीहून कल्याणला जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून वाहनचालक ठाकुर्ली रेल्वे क्रॉसिंगचा वापर करतात. त्यामुळे फाटकाजवळ वाहनांची नेहमीच मोठी गर्दी होत असते. फाटक उघडल्यानंतर घाईघाईने वाहन पार करण्याची जणू स्पर्धाच लागते. संध्याकाळी वाहनांच्या गर्दीमुळे चोळेगाव-ठाकुर्ली रस्त्यावर  वाहतूक कोंडी होते. त्याचा फटका वाहन चालकांना व नागरिकांना सहन करावा लागतो.

रेल्वे फाटकाजवळ आरपीएफ हे 24 तास उभे असतात. रेल्वे फाटक बंद होताना आणि उघडताना ते चोखपणे काम बजावताना दिसतात. मात्र शनिवारचा अपघात हा एकमेकांचा अंदाज चुकल्याने घडल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. सध्या डोंबिवली पूर्व पश्चिमेस जोडणार्या रेल्वे पुलाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. जोपर्यंत पुल सुरू होत नाही तोपर्यंत रेल्वे फाटक बंद होणार नाही. स. वा. जोशी शाळेसमोरील पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल केव्हा पूर्ण होणार? ठाकुर्लीचे रेल्वे क्रॉसिंग फाटक केव्हा बंद होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: tempo dash on railway crossing gate