नोटा बदलून देण्याच्या प्रलोभनाने व्यावसायिकाला १५ लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

दोन हजार रुपयांच्या नोटांच्या बदल्यात १०० रुपये दराच्या नोटा व १५ टक्के कमिशन देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीने महाड येथील व्यावसायिकाला १५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबई : दोन हजार रुपयांच्या नोटांच्या बदल्यात १०० रुपये दराच्या नोटा व १५ टक्के कमिशन देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीने महाड येथील व्यावसायिकाला १५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खारघर पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.  

फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव राजन गांधी यांची जानेवारी महिन्यात अनदीपकुमार गौतम या भामट्यासोबत ओळख झाली होती. त्या वेळी अनदीपकुमार याने २००० रुपये दराच्या नवीन नोटांच्या बदल्यात १०० रुपये दराच्या नोटा देऊन, त्यावर १५ टक्के कमिशन देण्याचे  गांधी यांना सांगितले. त्यामुळे गांधी यांनी १५ टक्के कमिशन मिळेल या आशेने स्वत:कडे असलेली १५ लाख रुपयांची रोख रक्कम अनदीपकुमार याचा सहकारी अरविंद पटेल याच्याकडे दिली. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे गांधी यांच्या लक्षात आले. 

दिल्लीतील व्यावसायिकाला यापूर्वी २५ लाखांचा गंडा
जुलै महिन्यामध्ये याच टोळीने दिल्लीतील एका व्यावसायिकाला २००० रुपये दराच्या नोटा, पाचशे व शंभर रुपयांमध्ये बदलून देण्याबरोबरच २० टक्के कमिशन देण्याचे प्रलोभन दाखविले होते. या व्यावसायिकालाही त्यांनी २५ लाख रुपयांचा गंडा घातला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the temptation to change notes 15 lakh rupees to the businessman