अनिवासी भारतीयाची 10 कोटींची फसवणूक 

अनिवासी भारतीयाची 10 कोटींची फसवणूक 

मुंबई - बनावट कागदपत्रांद्वारे अनिवासी भारतीयाची दहा कोटींची फसवणूक करणाऱ्या एका व्यावसायिकास आर्थिक गुन्हे शाखेने विमानतळावरून अटक केली. आरोपीने भागीदारीत जमिनीच्या खरेदीचे प्रलोभन दाखवले होते; मात्र प्रत्यक्षात जमीन मालकाला अवघे एक कोटी रुपये देऊन उर्वरित दहा कोटींचा अपहार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. 

देवेन जितेंद्र मेहता असे आरोपीचे नाव असून, तो मलबार हिल येथील रहिवासी आहे. योगेश शहा (वय 52, मूळ रा. गुजरात) यांनी यासंदर्भात तक्रार दिली. 30 वर्षांपासून ते हॉंगकॉंगमध्ये हिऱ्यांचा व्यापार करतात. 2008 मध्ये आरोपी देवेन याने 20 कोटींमध्ये अलिबाग येथे दहा एकर जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव शहा यांच्यासमोर ठेवला होता. त्या वेळी शहा यांनी विश्‍वास ठेवून देवेनवरच व्यवहाराची जबाबदारी सोपवली होती. त्याच्या सांगण्यावरून शहा यांनी विविध बॅंक खात्यांमध्ये दोन कोटी रुपये जमाही केले. त्यासाठी शहा आणि त्यांच्या पत्नीला देवेनने सात-बारा, बिनशेती आदेश, विक्री करार आदी बनावट कागदपत्रे तयार करून दिल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. जमीन मालकाला देवेनने प्रत्यक्ष एक कोटीचा धनादेश दिला होता; मात्र दहा कोटी रुपये दिल्याचे भासवण्यासाठी त्याने शहा यांना बनावट धनादेश दाखवला. शहा यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार देवेनच्या विरोधात लूक आऊट सर्क्‍युलर (एलओसी) जारी करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर देवेन दिसताच त्याला अटक करण्यात आली. तो दुबईहून मुंबईत आला होता. त्याच्याविरोधात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com