शिवसेनेची फक्त दहा रुपयांत जेवणाची थाळी अखेर 'इथं' झाली सुरु..

शिवसेनेची फक्त दहा रुपयांत जेवणाची थाळी अखेर 'इथं' झाली सुरु..

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं सर्व सामान्य जनतेसाठी फक्तं १० रुपयांत सकस आहार देणारी जेवणाची थाळी त्यांच्या वचननाम्यात जाहीर केली होती. आता शिवसेनेची सत्ता आल्यानंतर राज्य सरकारची अधिकृत फक्त दहा रुपयांत जेवण थाळी येण्याआधीच मुंबईतील मुलुंडमध्ये शिवसैनिकांनी स्वत:हून फक्त दहा रुपयांत 'माऊली थाळी' योजना सुरू केलीय.

मुंबईतील मुलुंड मधील शिवसैनिक जगदिश शेट्टी यांनी त्यांच्या स्वामी चँरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही 'माऊली थाळी' सुरू करण्यात आलीये. फक्त दहा रुपयांत सुरू केेेलेल्या या थाळीमध्ये तीन चपात्या, एक भाजी, डाळ-भात आणि मिष्टान्न यांचा समावेश असणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते या 'माऊली थाळी' उपक्रमाचं आज उद्धघाटन झालं. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने दिलेले 'दहा रुपयात थाळी' हे आश्वासन फारच चर्चेत राहिलं. दहा रुपयात जेवण देणं शक्य नसल्याचं सांगत अनेक जणांनी हा 'चुनावी जुमला' असल्याची टीका केली. मात्र आता काही समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून ही योजना सुरु होत असल्याचं समोर येतंय.

'जम्मू - काश्मीर'मध्ये 'साहेब खाना' 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या वचननाम्यात दहा रुपयांत जेवण देण्याचे आश्वासन दिले. त्यातूनच आदर्श घेऊन जम्मू-कश्मीर मधील शिवसेनेने गरजू लोकांना दहा रुपयांत 'साहेब खाना' सुरू केला आहे. 

WebTitle : ten rupees thali finally starts in maharashtra check where it has started

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com