मुंबई शहरावर दहा हजार सीसीटीव्हींची नजर

मुंबई शहरावर दहा हजार सीसीटीव्हींची नजर

मुंबई - मुंबई शहर सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पांतर्गत महानगरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. हा प्रकल्प अधिक  प्रभावी करण्यासाठी अतिरिक्त ५ हजार ६२५ कॅमेरे बसविण्यास व त्यासाठी ३२३ कोटी २३ लाख रुपयांच्या खर्चास आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली.

मुंबई शहर सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पांतर्गत मुंबई शहरामध्ये यापूर्वी १ हजार ५१० ठिकाणी मिळून ४ हजार ७१७ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. प्रकल्पाच्या करारातील तरतुदीनुसार, मुंबई शहरात अतिरिक्त ५ हजार ६२५ कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी ३२३ कोटी २३ लाखांचा खर्च होणार आहे.

मूल येथे कृषी महाविद्यालय
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्‍यात शासकीय कृषी महाविद्यालय स्थापनेस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या या महाविद्यालयाची प्रतिवर्ष प्रवेशक्षमता ६० विद्यार्थी इतकी असणार आहे. या महाविद्यालयासाठी आवश्‍यक ११० पदांच्या निर्मितीसह ६३ कोटी ४८ लाख इतक्‍या खर्चास या वेळी मान्यता देण्यात आली. या महाविद्यालयासाठी आवश्‍यक मनुष्यबळ व इतर सुविधा उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली.

राज्य शासन १५ टक्के मार्जिन मनी देणार
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्रकल्पाच्या कमाल १५ टक्के मार्जिन मनी देण्यास मंजुरी देण्यात आली. केंद्र शासनाच्या स्टॅंड अप इंडिया या योजनेतील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नव उद्योजकांकडे मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्याचे आढळून आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com