घरफोड्यांची जिल्ह्यात दहशत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

मुंबई : जिल्‍ह्यात २०१८ मध्‍ये घरफोडीचे २०९ गुन्‍हे दाखल होते. यावर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीत १०१ गुन्‍हे दाखल आहेत. त्‍यामुळे घरफोडींच्‍या घटनांवर नियंत्रण आणण्‍यात पोलिस अपयशी ठरत असून जिल्‍ह्यात घरफोड्यांची दहशत वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

रायगडमध्‍ये अलिबाग, मुरूड, रोहा, कर्जत, खालापूर, पाली, म्हसळा, माणगाव, 
महाड तालुका, महाड शहर, महाड एमआयडीसी, पोलादपूर, तळा, गोरेगाव, दिघी सागरी, श्रीवर्धन, रेवदंडा, कोलाड, पोयनाड, पेण, वडखळ, मांडवा सागरी, नागोठणे, दादर सागरी, खोपोली, नेरळ, माथेरान अशी एकूण २८ पोलिस ठाणे आहेत.

जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०१८  या कालावधीत घरफोडीचे २०७ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ९४ गुन्ह्यांची उकल पोलिसांकडून करण्यात आली. ११३ घरफोडीचे गुन्हे अद्याप उघडकीस आलेले नाहीत. दीड वर्षात ३०८ घरफोडीचे गुन्हे दाखल झाले. त्यापैकी फक्त ५० टक्के म्हणजे १२४ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिस प्रशासनाला यश आले आहे.

जिल्ह्यातील घरफोडी उघडकीस आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यामधील आरोपींना नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. दक्षिण रायगडमधील गुन्हे उघडकीस आणून टोळीला अटक केली आहे. महाराष्ट्रात गुन्हे उघडकीस आणण्यात रायगड पोलिस दल आघाडीवर आहे. त्यामुळे उर्वरित गुन्हे लवकरच उघडकीस आणले जातील.
- अनिल पारस्‍कर, पोलिस अधीक्षक, रायगड पोलिस  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Terror in the burglary district