दहशतवादी कारवायांबाबत कॉंग्रेस गप्प का? - भांडारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

सत्तेवर आल्यास देशद्रोहाच्या गुन्ह्याचे कलम रद्द करू, असे जाहीर आश्वासन कॉंग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात दिल्यानंतर आणि त्या पक्षाने उघडपणे फुटीरतावाद्यांचे समर्थन केल्यानंतर जम्मू- काश्‍मीरमध्ये रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकाची दहशतवाद्यांकडून हत्या आणि छत्तीसगडमध्ये भाजपच्या आमदाराची हत्या, अशा घटना घडल्या आहेत.

मुंबई - सत्तेवर आल्यास देशद्रोहाच्या गुन्ह्याचे कलम रद्द करू, असे जाहीर आश्वासन कॉंग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात दिल्यानंतर आणि त्या पक्षाने उघडपणे फुटीरतावाद्यांचे समर्थन केल्यानंतर जम्मू- काश्‍मीरमध्ये रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकाची दहशतवाद्यांकडून हत्या आणि छत्तीसगडमध्ये भाजपच्या आमदाराची हत्या, अशा घटना घडल्या आहेत.

कॉंग्रेस पक्ष आणि त्याच्या साथीदारांनी, तसेच लोकशाहीसाठी गळा काढणाऱ्या विचारवंतांनी या घटनांचा ठामपणे निषेधसुद्धा केलेला नाही. या घटनाक्रमाचा अर्थ काय, असा प्रश्न प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी आज विचारला.

Web Title: Terrorist Movement Congree Madhav Bhandari

टॅग्स