कारागृहात मिळणार खमंग पदार्थ

कारागृहात मिळणार खमंग पदार्थ

मुंबई : राज्यातील सर्व कारागृहांमध्ये पुन्हा एकदा मटणवडे, वडापाव आदी चमचमीत पदार्थांबरोबरच नूडल्सही मिळणार आहे. ११ वर्षांपूर्वी कारागृहांमध्ये बंद झालेले ‘वेट कॅंटीन’ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे.

राज्यातील सर्व कारागृहांमध्ये कैद्यांसाठी तुरुंग प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या नियमित जेवणासह ‘वेड ॲण्ड ड्राय’ अशा प्रकारच्या कॅंटीन चालवल्या जात होत्या. या दोन्ही कॅंटीनमधील पदार्थ कैद्यांना विकत घेता येत होते, मात्र २००८ मध्ये यापैकी ‘वेट कॅंटीन’ बंद करण्यात आले.

‘वेट कॅंटीन’मधून कैद्यांना चमचमीत खाद्यपदार्थ विकत घेता येत होते. मात्र, काही कैदी विशेष परवानगी घेऊन तुरुंगात मांसाहार मिळवत होते. यावरून भेदभाव होत असल्याने ‘वेट कॅंटीन’ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

यापुढे मांसाहार, वडा, भजी हे पदार्थ कारागृहातील उपाहारगृहाच्या कॅंटीनमध्येच उपलब्ध होणार आहेत. या निर्णयाला गृह विभागाने परवानगी दिल्याची माहिती राज्य कारागृह सुधारसेवेचे अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली.

काय आहे ड्राय आणि वेट कॅंटीन? 
ड्राय कॅंटीनमधून कैद्यांना धूम्रपानासाठी सिगारेट, विडी, तंबाखू, बिस्किट, साबण, फरसाण आदी विकत घेता येत होते; तर ‘वेट कॅंटीन’मधून ओले खाद्य पदार्थ मिळतात.

खात्यातील रक्कम वाढवली
यापूर्वी कैद्यांना घरून मिळणारे आणि कारागृहातील मेहनताना म्हणून दरमहा साडेतीन हजार रुपये खात्यात जमा करता येत होते. मात्र, आता ‘वेट कॅंटीन’ची सुविधा सुरू झाल्याने यात एक हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता कैद्यांना चार हजार ५०० रुपये कैद्यांच्या खात्यात जमा ठेवता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com