टीईटी परीक्षेला 17 हजार जणांची दांडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

मुंबई - शालेय शिक्षकांसाठी बंधनकारक असलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी (ता. 15) राज्यभरातील विविध केंद्रांवर झाली. या परीक्षेला 16 हजार 791 उमेदवार अनुपस्थित होते. राज्यभरातील 509 केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी 1 लाख 73 हजार 449 उमेदवारांनी नोंदणी केली होती. पहिली ते पाचवी या इयत्तांसाठी होणाऱ्या पेपर क्रमांक 1 साठी 95 हजार 787 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 85 हजार 521 उमेदवारांनी परीक्षा दिली. नऊ हजार 266 उमेदवार गैरहजर राहिले. सहावी ते आठवीच्या शिक्षकांसाठी असलेल्या पेपर क्रमांक 2 साठी 77 हजार 662 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 70 हजार 139 उमेदवारांनी परीक्षेला हजर राहिले. सात हजार 525 उमेदवारांनी गैरहजर राहिले. या दोन्ही पेपरला 89.74 टक्के उमेदवार उपस्थित होते.
Web Title: TET exam 17000 examiner absent