TET घोटाळ्यातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना सरकार देतय संरक्षण ; अंबादास दानवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Opposition leader Ambadas Danve

TET घोटाळ्यातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना सरकार देतय संरक्षण ; अंबादास दानवे

मुंबई : राज्यात मागील काही महिन्यात सर्वाधिक गाजलेल्या टीईटी परीक्षेच्या घोटाळ्यात थेट सहभाग असलेले तत्कालीन आरोपी सनदी अधिकारी सुशील खोडवेकर यांना सरकारने संरक्षण देत आहे. त्याच्यावर आरोप असताना सरकारने त्याला सेवेत घेऊन ते सिद्ध केले असल्याचा घणाघात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर केला. तसेच टीईटी परीक्षेच्या घोटाळ्यात ज्यांच्या मुलांची नावे आली आणि ज्यांचे गुण वाढविण्यात आले, त्या मंत्र्यांचा यात सहभाग आहे का, हेही तपासले पाहिजे आणि या प्रकरणाची नव्याने चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

विधान परिषदेत पुरवण्या मागण्या वरील चर्चेची सुरुवात करताना विरोधी पक्षनेते दानवे यांनी राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळाचे वीज बिल भरले जात नसल्याने त्या अडचणीत येतात, त्यामुळे या शाळांमध्ये संगणक आदी आपण देतो पण वीज नसल्याने त्याचा वापर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होत नाही, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचे वीज बिल भरण्यासाठी कायमची तरतूद करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

टीईटी घोटाळ्यात ज्या विद्यार्थ्यांचे गुण वाढविण्यात आले, त्यांची एक मोठी यादीच त्यांनी सभागृहात वाचून दाखवली. याच घोटाळ्यातील भ्रष्टाचारी सनदी अधिकारी सुशील खोडवेकर यांचे निलंबन झालेले असताना ते निलंबन या सरकारने मागे घेतले.हे सरकार टीईटी घोटाळ्यातील अधिकारी आणि गुण वाढ केलेल्या मंत्र्यांच्या मुलांना संरक्षण देत आहे.त्यामुळे या प्रकरणात या मंत्र्यांचा सहभाग आहे, हेही तपासणे पाहिजे, आणि या प्रकरणाची नव्याने चौकशी होणे आवश्यक आहे. भ्रष्टाचार झालेला आहे, त्यांच्या नावावर सर्व स्पष्टपणे पुरावे असताना ती दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Web Title: Tet Exam Scam Corrupt Officials Opposition Leader Ambadas Danve

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..