‘तनिष्का’तर्फे कापडी पिशव्यांची कार्यशाळा

‘तनिष्का’तर्फे कापडी पिशव्यांची कार्यशाळा
‘तनिष्का’तर्फे कापडी पिशव्यांची कार्यशाळा

नवी मुंबई : ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘तनिष्का’ व्यासपीठातर्फे सीबीडी-बेलापूर येथील ‘सकाळ भवन’मध्ये तनिष्कांसाठी खास एकदिवसीय कापडी पिशव्या बनविण्याची कार्यशाळा शनिवारी (ता.१४) आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत तनिष्कांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

या वेळी कल्पिता साटम, अदिती कोरगावकर, वैदेही गालणकर, श्‍वेता, स्नेहा या सर्व प्रशिक्षकांचे महिलांना सखोल आणि विस्तृत मार्गदर्शन लाभले. राज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू असून, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी कापडी पिशवी प्लास्टिक पिशवीला सक्षम पर्याय ठरत आहे. कापडी पिशवी प्रत्येक घरात पर्यावरण रक्षणाचा संदेश उत्तमरित्या पोहोचवेल, याच उद्देशाने ‘तनिष्का’तर्फे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कापडी पिशव्यांचे व्यवसायपूरक स्वरूपात प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे या प्रशिक्षणाद्वारे तनिष्कांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचा मार्ग सापडला. 

प्रशिक्षणात साधी बाजार उपयोगी पिशवी, साडी ठेवण्यासाठी लागणारी पिशवी, ब्लाउज ठेवण्यासाठी लागणारी पिशवी, छोट्या फ्रेन्डली कापडी पर्स, दोन्ही बाजूने वापरता येणारी स्मार्ट पिशवी, नाणी ठेवण्यासाठी लागणारी पिशवी, भाज्या ठेवण्यासाठी लागणारी निरनिराळे कप्पे असणारी पिशवी, कप्प्यांची पिशवी, मोबाईल ठेवण्यासाठी लागणारी पिशवी, प्रवासासाठी लागणारी पिशवी, टिफिन बॅग्स तसेच वजनाला हलक्‍या पण वापरण्यासाठी दणकट पिशव्या आणि डिझायनर पिशव्या बनविण्याचे मार्गदर्शन कार्यशाळेत देण्यात आले. या कार्यशाळेसाठी नवी मुंबईमधील वाशी, नेरूळ, सीवूड्‌स, सीबीडी बेलापूर, खारघर, कामोठे, कळंबोली आणि पनवेल विभागातील तनिष्का उपस्थित होत्या. तनिष्का व्यासपीठाच्या पुढील सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी ८४५०९१३८८९ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com