ठाकरे पितापुत्रांची राष्ट्रपतींशी सदिच्छा भेट 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 मार्च 2017

मुंबई - मुंबईच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राजभवनात झालेल्या या 20 मिनिटांच्या भेटीच्या वेळी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते. 

निवडणुकांचे निकाल तसेच कर्जमाफी या विषयावरून शिवसेना आणि भाजप या सत्ताधारी आघाडीत तणाव निर्माण झाला असतानाच ठाकरेंनी घेतलेली ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय होती. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता, त्यामुळे या भेटीला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ""ही सदिच्छा भेट होती.'' या भेटीतून काहीही नवे किंवा राजकीय बाहेर येण्याचा किंवा निघण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे शिवसेनेच्या एका नेत्याने स्पष्ट केले. भाजपने या भेटीवर कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र, त्याच वेळी शिवसेना राष्ट्रपतिपदाच्या आगामी निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेईल हे सांगणे कठीणच असल्याचे मतही व्यक्‍त केले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात तसेच एका वाहिनीच्या परिसंवादात त्यांच्यासमवेत होते. 

Web Title: Thackeray goodwill visit to the president