ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी; भाजपचा टोला

पूजा विचारे
Friday, 20 November 2020

लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांवर वाढीव वीज बिलाचा भार पडला.   विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. किरीट सोमय्या यांनीही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.  माझे लाईट बिल माझी जवाबदारी, असं ट्विट करत सोमय्यांनी ठाकरे सरकारला टोला हाणला.

मुंबईः  वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झालं. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांवर वाढीव वीज बिलाचा भार पडला. त्यानंतर सामान्य नागरिकांकडून सरकारला टिकेला सामोरं जावं लागलं. या पार्श्वभूमीवर वीज बिलात सवलत देणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी सवलत देता येणार नसल्याचं राऊत यांनी सांगितलं. त्यानंतर या मुद्द्यावरुन राज्यातलं राजकारण खवळलं आहे. विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. त्यात आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.  माझे लाईट बिल माझी जवाबदारी, असं ट्विट करत सोमय्यांनी ठाकरे सरकारला टोला हाणला आहे. 

किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी.

राज्य सरकारनं कोरोना विरुद्ध लढण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राबवली आहे. या मोहिमेच्या लोगोमध्ये बदल करुन त्यात त्यांनी वीज बिलाचा फोटो टाकला आहे. तसंच हे आपल्याला एका पत्रकारानं पाठवल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

मनसेकडून सरकारला अल्टिमेटम

वाढीव बिलाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही आक्रमक झाली आहे. गुरुवारी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला. यावेळी नांदगावकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. हा तर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात असल्याचं म्हणत सरकारनं दिलेला शब्द पाळायला पाहिजे होता, असं नांदगावकर म्हणालेत. तसंच दिलेला शब्द पाळणं ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

वाढीव वीजबिलांवरुन मनसेनं सरकारला अल्टिमेटम दिला आहे. सोमवारपर्यंत निर्णय घ्या अन्यथा राज्यभर आंदोलन करु, असा धमकीवजा इशारा मनसेनं राज्य सरकारला दिला आहे. वीज बिलात सवलत न देणं हा जनेतचा विश्वासघात आहे. त्यामुळे वीज कनेक्शन कापाल, तर याद राखा, असंही मनेसनं म्हटलं आहे.  तसंच काही उद्रेक झाला तर त्याला सरकार जबाबदार असेल, असंही मनसेनं स्पष्ट केलं आहे. 

अधिक वाचा-  भाजपला ठाकरे सरकारचा दणका, फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची होणार चौकशी

वाढीव वीज आल्यानंतर सामान्य माणसानं आत्महत्या करायची का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे निर्णय होईपर्यंत वाढीव वीजबिल भरु नका, असं आवाहन मनसेनं नागरिकांना केलं आहे.

Thackeray Government electricity bill issue bjp leader kirit somaiya slams by tweet


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thackeray Government electricity bill issue bjp leader kirit somaiya slams by tweet