देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत कपात; भाजपचा सरकारवर हल्लाबोल

पूजा विचारे
Sunday, 10 January 2021

देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर भाजपकडून या सरकारवर टीका केली जात आहे. 

मुंबईः महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील काही नेत्यांची सुरक्षा कपात तर काहींची वाढवण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील भाजप आणि इतर पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या झेड प्लस काढून व्हाय प्लस स्कॉड देण्यात आली आहे.  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्याही सुरक्षेत कपात केली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर भाजपकडून या सरकारवर टीका केली जात आहे. 

भाजप नेते राम कदम यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार सुडबुद्धीने भाजप नेत्यांच्या सिक्युरिटी कमी करत असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे. तसंच  भाजपा नेते गेल्या वर्षाभरापासून महाविकास आघाडी सरकारचे भष्ट्राचार बाहेर काढत आहे. त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांचं संरक्षण काढून घेत आहेत, असंही राम कदम म्हणालेत.

तर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही महाविकास आघाडी सरकारनं घेतलेल्या निर्णयावर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांच्या सुरक्षिततेमध्ये कपात करण्याचा राज्य सरकारने जो निर्णय घेतलाय तो दुर्दैवी, सूडाच राजकारण करणारा आणि खोट्या मनोवृत्तीचा असल्याचं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. 

आपण बघितलं असेल गेल्या वर्षभर मुख्यमंत्री घरी बसलेले होते. कोरोनाचा कहर असताना त्यावेळी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि अन्य नेते हे महाराष्ट्रात फिरून जनतेला दिलासा देत होते, असंही उपाध्ये म्हणाले आहेत. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Thackeray government security Reduce Devendra Fadnavis bjp leader Ram kadam cirtcism


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thackeray government security Reduce Devendra Fadnavis bjp leader Ram kadam cirtcism