Big News - गावी जाण्यासाठी इच्छुक नागरिकांसाठी ठाकरे सरकारचा 'मोठा' निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या राज्यातील आणि जिल्ह्यातील मजूर, कामगार यांच्यासह विद्यार्थी, पर्यटकही अनेक भागात अडकले आहेत. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकार तसंच राज्य सरकारनं शिथिलता दिल्यानंतर या सर्वाना त्यांच्या स्वगावी पोहोचवण्यात येत आहे

मुंबई - लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या राज्यातील आणि जिल्ह्यातील मजूर, कामगार यांच्यासह विद्यार्थी, पर्यटकही अनेक भागात अडकले आहेत. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकार तसंच राज्य सरकारनं शिथिलता दिल्यानंतर या सर्वाना त्यांच्या स्वगावी पोहोचवण्यात येत आहे. त्यासाठी सरकारनं रेल्वे, बस आणि खासगी वाहनाने प्रवास करण्याचीही मुभा दिली आहे. राज्यातून मजूरांना घेऊन जाण्यासाठी स्पेशल श्रमिक ट्रेनचीही सुविधा केली आहे. तसंच जिल्ह्यांतर्गतही मजूरांची स्थलांतर करण्यात येत आहे. मात्र या सर्वांना वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 

राज्यातल्या विविध जिल्ह्यांत किंवा इतर राज्यात प्रवास करणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यासाठी ई-पास किंवा पोलिस परवानगी मिळविण्यासाठी कोविड 19 ची लक्षणे नसलेले वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक आहे. दरम्यान आता ही तपासणी मोफत केली जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून हे स्पष्ट करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून या संदर्भात एक ट्विट केलं आहे. 

अरे बापरे ! "जून आणि जुलैमध्ये येणार कोरोनाची मोठी लाट"

काय म्हटलं ट्विटमध्ये 

लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी जाऊ इच्छिणारे स्थलांतरीत कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्ती यांना प्रवास सुरु करण्यापुर्वी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार आहे. शासकीय तसेच महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत ही वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

परप्रांतीयासाठी मुंबईतून सुरु होणार विशेष ट्रेन

मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्यासाठी लवकरच मुंबईतूनही रेल्वेगाड्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. विश्वसनीय सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. तिसऱ्या लॉकडाऊनच्या काळात या मजूरांना कामगारांना आपआपल्या राज्यात परत पाठवण्याची तयारी गेली आणि त्यानुसार त्यांच्यासाठी विशेष ट्रेन सोडण्यात आले. महाराष्ट्रातून पहिली ट्रेनही भिवंडी आणि नाशिकहून सोडण्यात आली. 

या वर्षातला अत्यंत किळसवाणा प्रकार : कचराकुंडीतील भाज्या विक्रीला...

मुंबईत अडकलेले मजूर आणि कामगार हे प्रामुख्यानं उत्तर प्रदेश आणि बिहारचे आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रातून आणि मुंबईतल्या जवळच्या रेल्वे स्थानकावरुन आधीच रेल्वेगाड्या रवाना झाल्या आहेत. मात्र अद्याप प्रत्यक्षात मुंबईतल्या कुठल्याही रेल्वे स्थानकावरुन मजुरांना नेणारी गाडी सोडण्यात आलेली नाही. या मजुरांबाबत उत्तर प्रदेश सरकारशी राज्य सरकारनं चर्चा देखील केली. त्यावेळी काही अटी असल्यामुळे काही समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र आता ते प्रश्न मिटले असून मुंबईतून रेल्वेगाड्यांनी परप्रांतीयांना नेण्यात येईल, असं सांगण्यात येत आहे.

thackeray governments big decision for those who want to go home


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thackeray governments big decision for those who want to go home