उद्धव ठाकरे यांची आघाडी 

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 8 February 2017

मुंबई - भारतीय जनता पक्षाबरोबरची युती तोडण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभांचा धडाका लागवत प्रचारात आघाडी घेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 

मुंबई - भारतीय जनता पक्षाबरोबरची युती तोडण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभांचा धडाका लागवत प्रचारात आघाडी घेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे जागावाटपावरून बिनसले. त्यानंतर गोरेगाव येथे प्रजासत्ताकदिनी झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर या पुढे कोणतीही युती नाही. आम्ही (शिवसेना) पंचवीस वर्षे सडलो, असे स्पष्ट केले. त्यानंतर मुंबईत उद्धव यांनी सभांचा डाव मांडला. गिरगाव येथे त्यांनी प्रचाराची सभा घेतली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाची खिल्ली उडवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. 

मुलुंड येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्यावर टीका करीत समाचार घेतला. या सभेतही त्यांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपच्या धोरणावर टीका केली. चांदिवली येथील सभेत तर ठाकरे यांनी थेट मोदी यांना मुंबईत सभा घेण्याचे आव्हान केले. पहिल्या टप्प्यात उद्धव यांनी मुंबईत प्रचारात आघाडी घेतली असून, शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण केले असल्याचे चित्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thackeray lead