‘ठाकरे’ करणार अनोखा विक्रम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

मुव्ही मॅरेथॉन
कार्निव्हल सिनेमा येथे या चित्रपटाची २७ तारखेपर्यंत मुव्ही मॅरेथॉन भरवून विश्‍वविक्रम करण्यात येणार आहे. २५ तारखेला पहाटे ४ वाजता होणाऱ्या पहिल्या खेळानंतर या चित्रपटाचे ‘नॉनस्टॉप’ खेळ होणार आहेत. मुव्ही मॅरेथॉनमधील शेवटचा खेळ २७ तारखेला पहाटे २ वाजता होईल.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या हिंदी तसेच मराठी चित्रपटाचा पहिला खेळ शुक्रवारी (ता. २५) वडाळा येथील आयमॅक्‍स कार्निव्हलमध्ये पहाटे ४ वाजता होणार आहे. आजवर मुंबई-महाराष्ट्रात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचे चित्रपट पहाटे ५.३०-६ वाजता प्रदर्शित झाले होते; परंतु हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत भल्या पहाटे प्रदर्शित होण्याचा मान ‘ठाकरे’ चित्रपटाला मिळणार आहे.

पहाटे ४ वाजता ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्‍यांच्या आतषबाजीत या चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. या वेळी शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात येणार आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘कार्निव्हल मोशन पिक्‍चर्स’सह या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. कार्निव्हल सिनेमाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत भसी म्हणाले, ‘‘बाळासाहेब ठाकरे हे भारतीय राजकारणातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्रातील लोकांच्या मनात त्याच्याबद्दल प्रचंड आदर आणि देवासमान स्थान आहे. महाराष्ट्रासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या व्यक्तीचा जीवनपट पडद्यावर आणण्याच्या कार्याचा आम्ही एक भाग आहोत, याचा मला अभिमान वाटतो.  लोकाग्रहास्तव आम्ही या चित्रपटाचा शो पहाटे ठेवणार आहोत.’’ हा चित्रपट संपूर्ण देशात साधारण २००० स्क्रिन्सवर दाखवला जाणार आहे. 

मुव्ही मॅरेथॉन
कार्निव्हल सिनेमा येथे या चित्रपटाची २७ तारखेपर्यंत मुव्ही मॅरेथॉन भरवून विश्‍वविक्रम करण्यात येणार आहे. २५ तारखेला पहाटे ४ वाजता होणाऱ्या पहिल्या खेळानंतर या चित्रपटाचे ‘नॉनस्टॉप’ खेळ होणार आहेत. मुव्ही मॅरेथॉनमधील शेवटचा खेळ २७ तारखेला पहाटे २ वाजता होईल.

Web Title: Thackeray movie released on Friday in Maharashtra