ठाकरेंच्या स्मारकाबाबत घाई करणार नाही - उद्धव 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. समितीकडे लवकरच महापौर बंगल्याची जागा हस्तांतरित होईल. घाईगडबडीत भूमिपूजन करण्यापेक्षा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच याबाबत घोषणा करू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले. 

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दादर येथील महापौर निवासस्थानाची जागा देण्याची घोषणा गेल्या वर्षी स्मृतिदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर, आठ-नऊ महिने कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. बाळासाहेबांच्या चौथ्या स्मृतिदिनी गुरुवारी या स्मारकाचे भूमिपूजन होण्याची शक्‍यता होती. वर्षभरात कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. बुधवारी (ता. 16) राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय स्मारकाबाबत बैठक घेणार होते. ही बैठकही रद्द करण्यात आली. पत्रकारांशी बोलताना उद्धव म्हणाले, ""स्मारकाबाबत घाई करणार नाही. जे करू ते जगाने पाहिले पाहिजे. शिवसेनाप्रमुखांचे जगात अप्रतिम असे स्मारक निर्माण करू. स्मारकाबाबत लवकरच घोषणा करू.'' त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी या स्मारकाचे भूमिपूजन होण्याची शक्‍यता वाढली आहे. 

नागरिकांच्या सूचनांचाही विचार 

स्मारकाचा आराखडा तयार करण्यासाठी लोकांच्या सूचना स्वीकारल्या जातील. त्यासाठी तज्ज्ञांची सल्लागार समिती स्थापन करण्यात येईल. नागरिकांना आपल्या सूचना, आठवणी व छायाचित्रे शिवसेनेकडे पाठवता यावीत, यासाठी संकेतस्थळ सुरू करणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

Web Title: Thackeray will not hurry about the monument