ठाण्याचा पारा चाळिशी पार 

ठाण्याचा पारा चाळिशी पार 

ठाणे - मार्चमध्येच मे महिन्याची अनुभूती येथील नागरिक घेत आहेत. काही दिवस उन्हाचा पारा चढताच राहिला असून रविवारी कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस इतके होते. उन्हाच्या काहिलीने नागरिक घामाघूम होत असून घराबाहेर पडताना त्यांना विचार करावा लागत आहेत. अगदीच महत्त्वाचे असल्यास छत्री घेऊन अथवा चेहरा रुमालाने बांधूनच ते घराबाहेर पडत आहेत. उन्हामुळे आपसूकच विजेचा वापर वाढला असून भविष्यात भारनियमनालाही तोंड द्यावे लागण्याची शक्‍यता व्यक्त होत असल्याने नागरिकांना आणखीनच घाम फुटला आहे. 

तलावांचे शहर अशी ख्याती असलेल्या ठाणे शहरातील नैसर्गिक संपदा लोप पावत आहे. शहरातील 356 किलोमीटरपैकी तब्बल 281 किलोमीटरचे रस्ते सिमेंट-कॉंक्रीटचे बनल्याने मातीशी संपर्क तुटला आहे. काही वर्षांत तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मागील आठवड्याभरात उन्हाचा पारा 37 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याची नोंद ठाणे महापालिकेच्या हवामान विभागाकडे नोंदवण्यात आली आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामांच्या वेळा बदलल्या आहेत. दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असल्याने या कालावधीत रस्त्यावरील वर्दळ रोडावलेली दिसत आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोप्या, मोठे रुमाल, स्कार्फ व गॉगलला वापर मोठ्या प्रमाणात होत आहेत. यांची विक्रीही वाढली आहे. 

ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष तापमानाची नोंद ठेवत आहे. दिवसभरातील तापमानाचा आलेख हा कमाल (दिवसातील सर्वाधिक) व किमान (सर्वात कमी) तापमानातून कळतो. रविवारी कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस, तर किमान तापमानाची 26 अंश सेल्सिअस नोंद झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. 

तापमान तक्ता (अंश सेल्सिअसमध्ये) 
दिवस कमाल किमान 
0 22 मार्च 2017 37.02 24.01 
0 23 मार्च 2017 38.06 24.01 
0 24 मार्च 2017 36.05 24.00 
0 25 मार्च 2017 35.06 23.01 
0 26 मार्च 2017 40.00 26.00 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com