Local: एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाहीत; ठाण्यातील धक्कादायक घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai local

Local: एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाहीत; ठाण्यातील धक्कादायक घटना

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात काल रात्री धक्कादायक घटना घडली असून एका एसी ट्रेनचे दरवाजे न उघडण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या लोकलमध्ये ३० ते ४० प्रवाशी अडकून पडले होते. या प्रकारानंतर ही गाडी कळवा कारशेड येथे गाडी नेण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, काल रात्री ठाण्यात ही धक्कादायक घटना घडली असून संकटकालीन बटण प्रवाशांनी दाबण्याचा प्रयत्न केला तरी काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तर त्यानंतर ही लोकल कळवा कारशेड येथे रात्री साडेबाराच्या दरम्यान नेण्यात आली होती. सदर प्रवाशांना त्यानंतर चालत घरी जावं लागल्याचं समोर आलं आहे.

या प्रकारानंतर प्रवाशांनी मध्य रेल्वेकडे तक्रार केली असून मध्य रेल्वेने, गाडीतील गार्डने लोकलचे दरवाजे उघडले पण २० सेकंदानंतर त्याने दरवाजे बंद केले असं स्पष्टीकरण मध्य रेल्वेने दिलं आहे. तर तक्रारीनुसार सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.

टॅग्स :Mumbai NewsLocal Train