मुरबाडमध्ये संततधार; गावांत पाणी घुसण्याची भीती

मुरलीधर दळवी
मंगळवार, 18 जुलै 2017

मंगळवारी पाण्याची पातळी 66 मीटरपर्यंत पोहचल्याने तोंडली काचकोली मोहघर जांभुळवाडी आदी गावातील घरांमध्ये धरणाचे पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोक भीतीच्या छायेत आहेत.

मुरबाड : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून सह्याद्री पर्वत रांगेत जोरदार पाऊस पडत असल्याने बारवी धरणातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी पाण्याची पातळी 66 मीटरपर्यंत पोहचल्याने तोंडली काचकोली मोहघर जांभुळवाडी आदी गावातील घरांमध्ये धरणाचे पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोक भीतीच्या छायेत आहेत.

मुरबाडमध्ये मंगळवार सकाळ पर्यंतच्या 24 तासात 56 मिमी पावसाची नोंद झाली आहे आता पर्यंत 1417 मिमी पाऊस पडला आहे बारवी धरणाचे पाणी लोकांच्या घरात घुसण्याची शक्यता असल्याने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना गावामध्ये पाठविण्यात आल्याचे नायब तहसीलदार हनुमंत जगताप यांनी सांगितले

मागच्या वर्षी तोंडली जांभुळवाडी परिसरातील अनेक घरांमध्ये धरणाचेे पाणी घुसल्याने लोकांना तात्पुरत्या पत्र्याच्या शेड मध्ये निवारा घ्यावा लागला होता या प्रकल्पग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन न झाल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: Thane breaking news in Marathi Murbad raining